“आमचे पंतप्रधान कोणाचेच ऐकत नाहीत”, राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका | पुढारी

"आमचे पंतप्रधान कोणाचेच ऐकत नाहीत", राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : “भारत असा देश बनू शकतो, जिथे बोलण्यासाठी परवानगी नसेल”, असे वक्तव्य काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये शुक्रवारी आयोजित केलेल्या ‘आयडिया फाॅर इंडिया’ संमेलनात केले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमत पवित्रा घेतला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “मी तुमचं ऐकून घेऊ इच्छित आहे, असा पंतप्रधानांचा स्वभाव असायला हवा. मात्र, आमचे पंतप्रधान कुणाचेच ऐकून घेत नाहीत. भविष्यात तुमच्याकडे असा देश असू शकत नाही, जिथे बोलण्यासाठी परवानगी नसेल. पीएमओ स्वतंत्ररित्या बोलू शकत नाहीत”, असे भाष्य राहुल गांधींनी केले.

आरएसएसवर निशाणा साधताना गांधी म्हणाले की, “आम्ही मानतो की, भारत आपापसांतील लोकांमध्ये संवाद करतो. पण, भाजपा आणि आरएसएस हे भारत एक भूगोल मानतात की, हा देश सोन्याची चिमणीसारखा आहे, ज्याच्या फायदा मोजक्यात लोकांना झाला पाहिजे. पण, आम्ही मानतो की, सर्वांना समान संधी असायला हवी. मग ते दलित असो किंवा ब्राह्मण. हाच खरा संघर्ष आहे.”

“जे बोलण्याला परवानगी देतात, आज त्याच संस्थांवर नियोजनबद्ध पद्धतीने हल्ले होत आहेत. संविधानांवर हल्ला होत आहे. तरीही भारतातील राज्यं आता बोलण्यास सक्षम आहेत”, असे मत राहुल गांधी भाजपावर केली. इतकंच नाही राहुल गांधी पुढे म्हणाले की, “रशिया युक्रेनमध्ये जे करत आहे, तशीच स्थिती चीन लडाखमध्ये निर्माण करत आहे. पण, मोदी सरकार यावर भाष्य करायला तयार नाहीत.”

पहा व्हिडीओ : जंगलातील पाणवठ्यावरील एक संध्याकाळ 

Back to top button