मोठी बातमी! Jet Airways उड्डाणास सज्ज, कंपनीचा शेअर सुसाट | पुढारी

मोठी बातमी! Jet Airways उड्डाणास सज्ज, कंपनीचा शेअर सुसाट

पुढारी ऑनलाईन डेस्क : तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा खासगी क्षेत्रातील जेट एअरवेजची (Jet Airways) विमानसेवा उड्डाणासाठी सज्ज झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) याला परवानगी दिली आहे. DGCA प्रमुख अरुण कुमार यांच्या म्हणण्यानुसार, जेट एअरवेजला एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) देण्यात आले आहे. हे एअरलाइनला व्यावसायिक उड्डाण ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्यास अनुमती देते. अशा परिस्थितीत लवकरच विमान कंपनी पुन्हा एकदा व्यावसायिक उड्डाणे सुरू करणार आहे. याआधी गृह मंत्रालयाने विमान कंपनीला सुरक्षा मंजुरी दिली होती. तेव्हापासून कंपनी लवकरच आपली सेवा सुरू करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

एअरलाइनने (Jet Airways) 2022 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची योजना आखली आहे. 5 मे रोजी जेट एअरवेजने प्रथमच चाचणी उड्डाण केले. यानंतर 3 अनिवार्य विमानसेवा संचलीत करण्यात आली. या फ्लाइटमध्ये डीजीसीएचे अधिकारीही सामील होते. यानंतर एअर ऑपरेटर प्रमाणपत्रास परवानगी देण्यात आली.

आर्थिक संकटामुळे जेट एअरवेजने (Jet Airways) एप्रिल 2019 मध्ये आपली उड्डाण सेवा बंद केली होती. सध्या जालान-कॅलरॉक कंसोर्टियम जेट एअरवेजचे प्रवर्तक आहे. दरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी जेट एअरवेजच्या शेअरने पुन्हा एकदा टेक ऑफ केला आहे.

बीएसई निर्देशांकावर शेअरची किंमत 113.30 रुपये होती, जी आदल्या दिवसाच्या तुलनेत सुमारे 5 टक्क्यांनी वाढ दर्शवते. गेल्या काही दिवसांच्या कामगिरीवर नजर टाकली तर जेट एअरवेजच्या स्टॉकमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.

Back to top button