चित्रा रामकृष्ण यांच्या जामीन अर्जावरून दिल्ली हायकोर्टाची सीबीआयला नोटीस | पुढारी

चित्रा रामकृष्ण यांच्या जामीन अर्जावरून दिल्ली हायकोर्टाची सीबीआयला नोटीस

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) गैरव्यवहाराच्या प्रमुख आरोपी चित्रा रामकृष्ण यांनी जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने याचिकेची दखल घेत सीबीआयला नोटीस जारी केली आहे. चित्रा रामकृष्ण या एनएसईच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

कनिष्ठ न्यायालयाने 12 मे रोजी झालेल्या सुनावणीवेळी चित्रा रामकृष्ण यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता, यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. न्यायमूर्ती सुधीरकुमार जैन यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेत सीबीआयला नोटीस बजावली व सुनावणी 31 मे पर्यंत तहकूब केली.

गुन्ह्याची व्याप्‍ती, त्याची गंभीरता पाहता चित्रा यांना जामीन देणे उचित ठरणार नाही, अशी टिप्पणी कनिष्ठ न्यायालयाने केली होती. या पाश्‍वर्र्भूमीवर उच्च न्यायालय त्यांना जामीन देणार काय? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button