ऑडीच्या धडकेने रिक्षाची झाली भिंगरी, भीषण अपघातात एक ठार (VIDEO) | पुढारी

ऑडीच्या धडकेने रिक्षाची झाली भिंगरी, भीषण अपघातात एक ठार (VIDEO)

हैदराबाद ; पुढारी ऑनलाईन : अंगावर शहारे आणणारा अपघात हैद्राबादमध्ये घडला आहे. दारूच्या नशेत एका ऑडिचालकाने रिक्षाला अशी धडक दिली की, रिक्षा भिंगरीप्रमाणे फिरली. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. हैद्राबादमधील सायबराबाद भागात ही घटना सोमवारी (दि. २८) पहाटे घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे त्या घटनेचा तपास करत आहेत. 

मद्यधुंद अवस्थेत असणारा एक युवक भरधाव वेगात ऑडी चालवत होता. दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला गाडीच्या वेगाचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्या तरुणाला रस्तावर समोर असलेली रिक्षादेखील दिसली नाही. वाऱ्याच्या वेगानं चाललेल्या ऑडिने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षाला धडक बसताच रिक्षा भिंगरीप्रमाणे फिरली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला व यात तरुण रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला.

सायबराबाद भागात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीसाठी हजर असलेला एक तरुण पहाटेच्या सुमाराला ज्युबिली हिल्स परिसरातील त्याच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत त्याच्या एक मित्र देखील सोबत गाडीमध्ये होता. सायबराबादमधील इनऑर्बिट मॉलजवळ त्याची गाडी आली असता तेथूनच एक रिक्षा चालली होती. त्यावेळी रिक्षाला ऑडिने धडक दिली. या धडकेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

या अपघातनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी सुजित, त्याचा मित्र आशिष आणि सुजितचे वडिल रघुनंदन रेड्डी यांना अटक केली आहे. त्यांच्यावर हिट-अँड-रनचा गुन्हा दाखल केला. या अपघातानंतर डॉक्टरांनी सांगितले की, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना वेग आणि दिशा यांच भान चालकाला राहत नाही. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. 

 

 

Back to top button