Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयात ९ न्यायमूर्तींनी घेतली शपथ | पुढारी

Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयात ९ न्यायमूर्तींनी घेतली शपथ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) नऊ न्यायमूर्तींनी बुधवारी पद तसेच गोपनीयतेची शपथ घेतली. या विस्तारानंतर उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची एकूण संख्या 44 वर पोहोचली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपीन सांघी यांनी 9 न्यायमूर्तीना शपथ दिली. या मध्‍ये तारा गंजू, मिनी पुष्करना, तुषार राव, मनमित अरोरा, सचिन दत्ता, अमित महाजन, गौरांग कांत आणि सौरभ बॅनर्जी यांचा समावेश आहे.

  13 मे रोजी नवीन न्यायमूर्तींच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले होते. शपथविधीच्या कार्यक्रमास विविध उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती, वकील तसेच नवनियुक्त न्यायमूर्तींचे कुटुंबीय उपस्थित होते. ताज्या विस्तारानंतर दिल्ली उच्च न्यायालयातील महिला न्यायमूर्तींची एकूण संख्या 12 वर गेली आहे.

हेही वाचा

Back to top button