नेपाळसोबतचे संबंध आणखी मजबूत होतील : पंतप्रधान मोदी यांचा विश्वास | पुढारी

नेपाळसोबतचे संबंध आणखी मजबूत होतील : पंतप्रधान मोदी यांचा विश्वास

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारत आणि नेपाळ दरम्यानचे संबंध काळाच्या कसोटीवर खरे उतरलेले असून, आपल्या दौऱ्यामुळे हे संबंध आणखी मजबूत होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज व्यक्त केला. बुद्ध पाैर्णिमेच्‍या औचित्य साधत मोदी सोमवारी नेपाळचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

भारत आणि नेपाळ यांच्यातले संबंध अद्वितीय असल्याचे सांगून मोदी (Narendra Modi) पुढे म्हणाले की, गेल्याच महिन्यात नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा (Sher Bahadur Deuba) यांच्यासोबत आपली चर्चा झाली होती. त्या लाभप्रद चर्चेनंतर आपण पुन्हा त्यांना भेटण्यास उत्सुक आहोत. जलविद्युत, विकास आणि संपर्क यासह सर्वच क्षेत्रात नेपाळसोबत सहयोग करण्यास भारत उत्सुक आहे. २०१४ साली पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून मोदी यांचा हा पाचवा नेपाळ दौरा आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button