वैष्णोदेवी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागून २ ठार - पुढारी

वैष्णोदेवी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागून २ ठार

जम्मू; पुढारी वृत्तसेवा: कटराहून जम्मूला जाणाऱ्या लोकल बसला कटरा येथून 1.5 किमी अंतरावर असलेल्या खरमलजवळ भीषण आग लागल्याने किमान दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बसला इंजिनच्या भागातून आग लागली आणि लवकरच संपूर्ण बसला आग लागली, असे एडीजीपी जम्मू यांनी सांगितले. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

कटराहून जम्मूकडे जात असलेल्या स्थानिक बस क्र. JK14/1831 ला कटरा येथून सुमारे 1 किमी अंतरावर आग लागली. संभाव्य कारण शोधले जात आहे. एफएसएल टीम घटनास्थळी तैनात. 02 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 22 जखमींना कटरा येथे हलवण्यात आले.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

‘हरित हायड्रोजन’ अर्थव्यवस्थेसाठी २५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Back to top button