रविकुमार दहिया : देशाला तीन ऑलिम्पिकपटू देणार हरियाणातल हे गावं; विकासापासून आहे वंचित | पुढारी

रविकुमार दहिया : देशाला तीन ऑलिम्पिकपटू देणार हरियाणातल हे गावं; विकासापासून आहे वंचित

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताला कुस्तीच्या आखाड्यातून सुवर्ण पदक मिळण्याची आशा संपुष्टात आली. ऑलिम्पिक मध्‍ये पैलवान रविकुमार दहिया चा ५७ किलो वजनी गटात पराभव झाला. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नाहरी या गाव चा असणारा रविकुमार दहिया. गावची लोकसंख्या साधारण १५ हजाराच्या आसपास आहे. पण या गावाने आतापर्यंत भारताला तीन ऑलिम्पिक मेडल जिंकून दिले आहेत.

हरियाणातलं नाहरी गाव म्हणजे पैलवानांच गाव म्हणून प्रसिध्द आहे. गावात ना स्वच्छ पाणी पिण्याची सोय, ना कोणत्या सुख सुविधा, तरिही या गावाने देशाला तीन मोठे पैलवान दिलेतं. यातले एक म्हणजे महावीर सिंह त्यांनी मास्को १९८० आणि लॉस एंजिल्स १९८४ मध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केल आहे. आणि दुसरा अमित दहिया यांनी लंडन मध्ये २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक मध्ये देशाच प्रतिनित्व केल आहे. आता तिसरा असणारा रविकुमार दहिया. हरियाणातील नाहरी या गावाला कुस्तीचा हा मोठा इतिहास आहे.

कुस्तीमुळे गावाच्या विकासाला सुरुवात झाली

वर्ष होत १९८४ महावीर सिंह यांनी ऑलिम्पिक मध्ये भारताचं दोनवेळा प्रतिनिधित्व केल होतं. त्यामुळं देशभरात त्यांचा बोलबाला होता. त्यांनी देशाचं नाव जगात पोहचवल होतं. त्यामुळे त्यावेळचे हरियाणाचे मुख्यमंत्री चैाधरी देवीलाल महावीर सिंह यांच्यावर खुश होते. त्यांनी महावीर सिंह यांना इच्छा विचारली, यावर पैलवान महावीर सिंह यांनी गावात पशु वैद्यकीय दवाखाना नसल्याच बोलून दाखवल. ते सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली.

यावर मुख्यमंत्री चैाधरी देवीलाल देण्याच कबुल केलं. आणि त्या गावात पशु वैद्यकीय दवाखाना सुरु झाला. महावीर चैाधरी यांनी वैयक्तिक कोणताही स्वार्थ न ठेवता नेहमी गावाची सेवा केली. त्यांनी गावात नवनवीन योजना राबवल्या आहेत. गावात नवे पैलवान तयार करण्यासाठीही प्रयत्न केले.

आताही नाहरी या गावातल्या लोकांच मत आहे की, रविकुमार च्या रुपाने नाहरी गावचा विकास होणार आहे. सरपंच सुनिल दहिया यांनी म्हटलं की, ‘या गावाने देशाला तीन ऑलिम्पियन खेळाडू दिले आहेत. या मातीत काहीतरी खास आहे’. असही त्यांनी म्हटलं आहे.
नाहरी या गावात आजही मोठं हॉस्पिटल नाही. हॉस्पिटलसाठी लोकांना शेजारी असणाऱ्या सोनीपत या गावात जायला लागते. मोठं कोणतही स्टेडियम नाही. आता गाववाल्यांनी रविकुमार पासून अनेक अपेक्षा आहेत.

हरियाणा सरकारने रविकुमार वर केला बक्षिसांचा वर्षाव

हरियाणा सरकारने तर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षावच केला. हरियाणा सरकारने रवीकुमार दहियाला ४ कोटी रुपये, क्लास वर पोस्टची नोकरी आणि हरियाणात तो कोठे म्हणेल तिथे जमीनही ५० टक्के सवलतीने देऊ केली आहे. याचबरोबर त्याचे गाव नाहरी येथे इंडोअर कुस्तीचे मैदान देखील राज्य सरकार बांधून देणार आहे.

रविकुमार ला पैलवान बनवण्यात वडिलांचा मोठा वाटा

रविकुमारला पैलवान करायचे या ध्येयाने त्याच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली. आपल्या सगळ्या अडीअडचणींवर मात करून मुलाच्या तयारीत त्यांनी कुठलीच कसर ठेवली नाही.

ते दररोज आपल्या गावातून छत्रसाल स्टेडियमवर जात होते. हे अंतर जवळपास ६० किलोमीटरचे आहे. ते रोज साडेतीनला उठत असत. त्यानंतर दूध, तूप आणि दही घेऊन घरापासून पाच किलोमीटर चालत जाऊन जवळच्या रेल्वे स्टेशनवर जात होते.

तेथून आजादपूरला जात. त्यानंतर पुन्हा दोन किलोमीटर चालून छत्रसाल स्टेडियमवर जात. परत येऊन दिवसभर शेतातील कामे करत असत.

१२ वर्षे त्याच्या वडिलांचा हा दीनक्रम होता. मात्र, कोरोना काळात याला ब्रेक लागला. रविने आता पदक कमावल्यानंतर हा सगळा त्रास त्याचे वडील विसरून गेले.

हे ही वाचलत का :

हे पहा :

पुण्यातील ओशो आश्रमाचा गैरव्यवहार भक्तांनी आणला चव्हाट्यावर

https://www.youtube.com/watch?v=uuupyhIWoxE

Back to top button