‘2 क्वार्टर दारू पिऊनही नशा नाहीच’, मद्यप्रेमीची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार | पुढारी

‘2 क्वार्टर दारू पिऊनही नशा नाहीच’, मद्यप्रेमीची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार

भोपाळ : पुढारी ऑनलाईन

सामान्यत: लोकं आपल्या समस्यांबाबत नेते आणि मंत्र्यांकडे अनेकदा तक्रारी करतात. मात्र मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका व्यक्तीने गृहमंत्र्यांकडे अजब तक्रार केली आहे. दोन क्वार्टर दारू पिऊनही त्याला नशा झाली नसल्याचे या मद्य प्रेमी व्यक्तीचे म्हणणे आहे. दारूमध्ये पाणी मिसळून ती विकत असल्याचा आरोपही या मद्यप्रेमीने केला आहे.

उज्जैनच्या बहादूर गंजमध्ये राहणाऱ्या लोकेंद्र सोठियाला दारू पिण्याचे व्यसन आहे. 12 एप्रिल रोजी त्यांनी क्षीर सागर परिसरात असलेल्या एका दारूच्या दुकानातून चार क्वार्टर देशी दारू खरेदी केली. दोन क्वार्टर प्यायल्यानंतरही त्याला दारूची नशा झाली नाही, तेव्हा त्यात भेसळ असल्याचे त्याला जाणवले, असा आरोप त्याने केला आहे. याबाबत त्याने दुकानदाराकडे तक्रार केली. यावर दुकानदारानेच त्याला धमकी देऊन हुसकावून लावलं.

संबंधित बातम्या

लोकेंद्रने म्हटले की, दारूमध्ये भेसळ केल्याच्या संशयामुळे त्याने दोन क्वार्टर शिल्लक ठेवल्या आणि पुरावा म्हणून त्या सादर केल्या. लोकेंद्र सोठिया स्वत:सह दोन क्वार्टर घेऊन उत्पादन शुल्क विभागात पोहोचला. येथे त्यांनी गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा, एसपी सत्येंद्र कुमार शुक्ला यांच्या नावाने उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केला. अन्य कोणी फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी ठेकेदारावर कारवाई करावी, असे त्याने अर्जात लिहिले. जर माझ्या मागणीवर सुनावणी झाली नाही तर तो ग्राहक फोरममध्ये तक्रार करेल. माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये यासाठी यावर कारवाई करण्याची गरज असल्यावे लोकेंद्रचे म्हणणे आहे.

Back to top button