पाकिस्तानातील सहा यू ट्यूब चॅनल्सवर बंदी | पुढारी

पाकिस्तानातील सहा यू ट्यूब चॅनल्सवर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने अफवा पसरविणार्‍या आणि देशात फूट पाडण्याच्या हेतूने खोट्या बातम्या देणार्‍या 16 यू ट्यूब न्यूज चॅनल्सवर बंदी घातली आहे. यात 10 भारतीय व तर 6 पाकिस्तानी यू ट्यूब न्यूज चॅनल्स आहेत. या चॅनल्सचे
भारतात 68 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स होते.

विशेषत: बंदी घालण्यात आलेल्या भारतातील न्यूज चॅनल्सवरून एका विशिष्ट समुदायाला जणू तो पूर्णपणे दहशतवादी आहे, असे दाखविण्यात येत होते. यातील काही चॅनल्सवरून देशाच्या ऐक्याला धोका उद्भवेल, अशी माहिती प्रसारित करण्यात येत होती, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धाबाबतही चुकीचे वृत्तांकन करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

बंदी घालण्यात आलेल्यांपैकी कुठल्याही चॅनलने आयटी नियम 2021 अंतर्गत केंद्र सरकारकडे प्रसारणासंबंधी माहिती सादर केलेली नाही. पाकिस्तानमधील चॅनल भारताविरोधात योजनाबद्धरीत्या चुकीची माहिती प्रसारित करीत आहेत. देशाचे लष्कर, जम्मू-काश्मीर,परराष्ट्र मंत्रालय, युक्रेन स्थितीसारख्या विषयांवर चुकीची माहिती दाखवली जात आहे, असेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

हेही वाचलंत का? 

Back to top button