बिहारमध्ये फडकावले 77 हजार 700 तिरंगे | पुढारी

बिहारमध्ये फडकावले 77 हजार 700 तिरंगे

पाटणा ः वृत्तसंस्था

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बिहारमध्ये एकाचवेळी पाच मिनिटे 77 हजार 700 भारतीय तिरंगे डौलाने फडकाविण्यात आले. या अभिनव उपक्रमाने राष्ट्रीय ध्वज फडकाविण्याच्या पाकिस्तानच्या नावे असलेला विक्रम मोडला आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महानायक बाबू वीर कुंवर सिंग यांच्या विजयोत्सव दरम्यान, जगदीशपूरमध्ये तिरंगा फडकाविण्याचा विक्रम नोंदवण्यात आला. यावेळी संबोधित करताना मंत्री अमित शहा यांनी ‘भारत माती की जय’ची घोषणा दिली. हेलिकॉप्टमधून पाच-पाच किलोमीटरपर्यंत लोकांच्या हाती तिरंगा पाहून मी नि:शब्द झालो आणि माझी छाती अभिमानाने फुलली असल्याचे मंत्री शहा यांनी सांगितले.

ड्रोन कॅमेर्‍याद्वारे रेकॉर्डिंग

यापूर्वी एकाच वेळी 57 हजार 500 वेळा राष्ट्रीय ध्वज फडकाविण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावे होता. जगदीशपूरमधील भारतीय तिरंगा फडकाविण्याच्या उपक्रमाचे ड्रोन कॅमेर्‍याद्वारे रेकॉर्डिंग करण्यात आहे.

Back to top button