बाबूल सुप्रियो यांचा भाजपसह राजकारणालाही Goodbye - पुढारी

बाबूल सुप्रियो यांचा भाजपसह राजकारणालाही Goodbye

नवी दिल्ली पुढारी ऑनलाईन : बाबूल सुप्रियो : भारतीय जनता पक्षाचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात बाबुल सुप्रियो यांना मोदींच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. त्यांनी फेसबुक पोस्टमधून ही माहिती दिली आहे.

भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारण आणि खासदारपद सोडण्याची घोषणा केली आहे. मला फक्त भाजप पक्ष आवडतो मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असही त्यांनी म्हटल आहे.

राजकारणात येण्यापूर्वी गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या खासदार बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून म्हटले की, त्यांनी  अमित शहा आणि जेपी नड्डा यांना काही दिवसांपूर्वी राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या निर्णयाची माहिती दिली होती. त्यांनी पुढे  “मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी मला प्रेरणा दिली. मी त्यांचं प्रेम कधीच विसरणार नाही.

Back to top button