नवीन लेबर कोड येत्या १ ऑक्टोबरपासून लागू, PF योगदान वाढणार - पुढारी

नवीन लेबर कोड येत्या १ ऑक्टोबरपासून लागू, PF योगदान वाढणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील मोदी सरकारकडून ‘नवीन लेबर कोड’ येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंडमधील योगदान वाढणार आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना आठवड्यातून चार दिवस कामावर हजेरी लावावी लागेल.
नवीन लेबर कोड 1 एप्रिलपासून लागू केले जाणार होते. मात्र विविध राज्यांनी मंजुरी न दिल्यामुळे ही अंमलबजावणी लांबली होती. नवीन लेबर कोड मध्ये कोड ऑन वेजेज, इंडस्ट्रियल रिलेशन, सोशल सेक्युरिटी, सुरक्षा आणि ऑक्यूपेशनल सेफ्टी व हेल्थ सामील आहेत.
नवीन नियम देशभरात लागू होणार आहेत. नवीन लेबर कोडमुळे कर्मचाऱ्यांना अनेक बदलांना सामोरे जावे लागेल. कर्मचाऱ्यांचे बेसिक मिनिमम वेतन वाढवावे, अशी मागणी गेल्या काही काळापासून सुरु आहे. त्याकडे सरकार लक्ष देणार काय, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
नव्या लेबर कोडमुळे विद्यमान 44 केंद्रीय कामगार कायद्यांत तार्किकता आणता येईल, असे दावा केला जात आहे. काही राज्यांनी लेबर कोडशी संबंधित ड्राफ्ट रूल वितरित करण्यास सुरुवात केली आहे.
या राज्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिशा, पंजाब, गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड आदी राज्यांचा समावेश आहे. लेबर कोड लागू झाल्यानंतर ग्रॅच्युईटी तसेच पीएफमधील कर्मचाऱ्यांचे योगदान वाढेल.
यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात दरमहा येणारी रक्कम कमी होईल. विशेष म्हणजे असंघटित क्षेत्रासाठीही नवीन लेबर कोड लागू होणार आहे. यामुळे इंडस्ट्री तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन एकसारखे होईल.
हे ही वाचलं का? 

Back to top button