राजस्थान : अखेर गेहलोत-पायलट यांच्यातील वादावर तोडगा | पुढारी

राजस्थान : अखेर गेहलोत-पायलट यांच्यातील वादावर तोडगा

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : राजस्थान काँग्रेसमधील अस्वस्थतेवर तोडगा काढण्यासाठी आता सचिन पायलट यांनीच पुढाकार घेतला आहे. सचिन पायलट यांनी नुकतीच दिल्लीवारी केली असून, त्यांनी तोडगा म्हणून केंद्रीय पातळीवरील महत्त्वाचे पद नको, असा निरोप पक्षश्रेष्ठींना दिला आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पालयट यांच्यातील वादावर तोडगा अतिंम टप्प्यात आला आहे. पायलट यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वात महत्त्वाचे पद देण्याचा प्रस्ताव आहे.

या प्रस्‍तावास पायलट यांनी  नकार कळवला आहे. त्यांनी राज्यातच काम करण्याची भूमिका पक्षाला कळवली आहे.

राजस्थान विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये होणार असून, यासाठी आतापासूनच तयारी करण्याचे कारण पायलट यांनी दिले आहे.

गेहलोत मंत्रिमंडळात पायलट उपमुख्यमंत्री होते. मात्र, दोघांतील बेबनावामुळे पायलट यांनी राजीनामा दिला.

त्यांच्यासोबत समर्थकांनीही राजीनामा दिला.

‍पायलट यांनी बंड केल्याने ते भाजपमध्ये जातील असे बोलले जात होते. तशा बातम्याही पसरल्या हाेत्या. मात्र, तसे झाले नाही.

पायलट यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले.

मंत्रिमंडळात फेरबदल होणार असून, अनेक मंत्र्यांना घरी बसविण्यात येणार आहे. गेहलाेत यांनी काही जागांसाठी आग्रह धरला आहे.

त्याजागी मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

माकन यांच्यासाेबत बैठका

राजस्‍थानमधील मंत्रीमंडळ विस्‍तारामध्‍ये पायलट समर्थकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांनी याबद्दल संकेत दिले आहेत.

यासंदर्भात माकन म्‍हणाले, राज्यातील अनेक मंत्र्यांना मी भेटलो आहे. त्यांनी मंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी आतापासूनच पूर्ण वेळ पक्षाचे काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पायलट गटामध्ये संघर्ष वाढला होता. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते.

त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी अजय माकन हे नुकतेच राज्यात दाखल झाले होते. त्यांनी गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती.

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या मागणीस विरोध केला आहे.

राजस्थानध्ये मंत्रिमंडळात ३० पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह २१ मंत्री आहेत.

सरकारमध्ये सध्या ९ मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत.

पाहा व्‍हिडीओ :कोयना धरणातून सोडलेले पडणारे पाणी लाल का आहे? काय आहे या लाल पाण्याचे रहस्य?

Back to top button