व्हाईस ॲडमिरल घोरमडे यांनी स्वीकारला नौदल उपप्रमुखपदाचा कार्यभार - पुढारी

व्हाईस ॲडमिरल घोरमडे यांनी स्वीकारला नौदल उपप्रमुखपदाचा कार्यभार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : व्हाईस ॲडमिरल सतीश घोरमडे यांनी शनिवारी नौदल उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. व्हाईस ॲडमिरल जी. अशोक कुमार यांची जागा सतीश घोरमडे यांनी घेतली आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या एकीकृत मुख्यालयात (नौसेना) कार्मिक सेवा नियंत्रक म्हणून घोरमडे यांनी काम पाहिलेले आहे.

नौसेनेच्या पूर्व कमांडचे चीफ ऑफ स्टाफ तसेच महासंचालक म्हणूनही त्यांनी याआधी काम केलेले आहे. राष्ट्रीय सुरक्षा अॅकॅडमीमध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर 1 जानेवारी 1984 रोजी घोरमडे नौदलात सामील झाले होते.

घोरमडे यांनी डायरेक्टर ऑफ पर्सनेल, नौसेना प्लान डायरेक्टर आणि नौसेना मुख्यालयात जॉइंट डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे.
गेल्या ३५ वर्षांत त्यांनी नौसेनाच्या विविध ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळली आहे.

घोरमडे यांनी २६ जानेवारी २०१७ रोजी अतिविशिष्ट सेवा पदक आणि २००७ मध्ये नौसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांचा २००० मध्ये नौसेना प्रमुखांकडून प्रशस्ति पदकाने सन्मान करण्यात आला होता.

हे ही वाचा :

 

Back to top button