भगतसिंग यांची भूमिका करणाऱ्या मुलाचा गळफासाने मृत्यू | पुढारी

भगतसिंग यांची भूमिका करणाऱ्या मुलाचा गळफासाने मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: १५ ऑगस्ट रोजी आयोजित देशभक्तीपर कार्यक्रमासाठी सराव करताना  एका ९ वर्षीय मुलाला गळफास लागल्‍याने मृत्‍यू झाला. भगतसिंग यांच्या फाशीच्या घटनेची तालीम सुरू असताना ही हृदयद्रावक घटना घडली.

उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. १५ ऑगस्ट रोजी शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी रंगीत तालीम सुरू होती. त्यावेळी शहीद भगतसिंग यांच्या फाशीच्या घटनेची रंगीत तालीम करत होता. अचानक मुलाला गळफास लागला. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव शिवम असे आहे.

नऊ वर्षीय शिवम भगतसिंगची भूमिका साकारत होता. शिवम फाशीच्या घटनेची रंगीत तालीम करण्यासाठी स्टूलवर चढला होता.

त्याने गळ्याभोवती दोरी अडकल्यानंतर अचानक खालील स्टूल घसरला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास घट्ट झाला.

सराव करत असताना त्याच्यासोबत अन्य मुलेही होती. ती त्याला मदत करु शकली नाहीत. दरम्यान या घटनेत शिवमचा मृत्यू झाला.

मुलाच्या कुटुंबीयांकडून ही घटना अपघाताने घडली असल्याचे सांगत कुणाविरुद्धही तक्रार दाखल केलेली नाही.

कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना न कळविता मुलावर अंत्यसंस्कार केले.

सराव करताना चुकून ही घटना घडल्याने कुणाला दोष देता येणार नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

तो आसपास खेळत होता. त्यानंतर तो शाळेत गेला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे मित्र होते.

तो फाशीच्या घटनेचा सराव करताना गळफास लावून घेतला आणि स्टूल बाजुला सरकले. त्यावेळी त्याचा श्वास गुदमरला. हे पाहून त्याच्यासोबतची मुले घाबरली.

काही समजण्याअगोदरच शिवम यांचा मृत्‍यू झाला हाेता.

पाहा व्हिडिओ:  फुकटची बिर्याणी

Back to top button