ब्राह्मण मुलीशी लग्न केल्यानंतर दलित तरुणाचा खून; उत्तर प्रदेशातील घटना - पुढारी

ब्राह्मण मुलीशी लग्न केल्यानंतर दलित तरुणाचा खून; उत्तर प्रदेशातील घटना

पुढारी ऑनलाईन डेस्क :  उत्तर प्रदेश येथे एका ब्राह्मण मुलीशी प्रेमविवाह करणाऱ्या दलित तरुणाचा खून मुलीच्या नातेवाईकांनी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र या दलित तरुणाच्या खून प्रकरणात आपला हात नसल्याचे मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

२४ जुलै रोजी अनिश कुमार चौधरी या युवकाची हत्या झाली असून त्याची पत्नी दीप्ती हिने आपल्या घरच्यांवरच आरोप केले आहेत.

अनिश आणि दीप्ती यांच्या लग्नानंतर तिचे नातेवाईक नाराज होते. त्यामुळे त्याचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ४ जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

दीप्ती आणि  अनिश हे गोरखपूर येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठात पदव्युत्तर पदवीसाठी एकत्र शिकत होते.

अनिश प्राचीन इतिहास तर दीप्ती समाजशास्त्र विषय घेऊन शिकत होती.

कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये या दोघांचीही ग्रामसेवक म्हणनू निवड झाली. नोकरी लागल्यानंतर २०१७ मध्ये त्यांची ओळख झाली.

त्यानंतर ते दोघेही विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भेटत होते. त्यातून त्यांचे प्रेम जुळले. त्यानंतर या प्रेमसंबंधांची चाहूल दीप्ती हिच्या घरच्यांना लागली.

त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला कारण ते तिचे लग्न अन्यत्र करू शकणार नाही.

दीप्ती गोरखपूर जिल्ह्यातील देवकली धर्मसेन गावची रहिवाशी होती. तिचे वडील नलिन कुमार मिश्र दुबईत नोकरी करत होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांनी येथे गारमेंटचे दुकान घातले होते. त्यांना दीप्तीसह तीन मुली आणि एक मुलगा होता.

तिघांचे विवाह झाले असून दीप्ती सर्वात लहान आहे. मुलगा उत्तर प्रदेश पोलिसांत असून तो श्रावस्ती येथे तैनात आहे.

अनिशवर बलात्काराचा गुन्हा

अनिश आणि दीप्तीने लग्न केल्याची माहिती मिळताच दीप्तीचे वडील नलिन यांनी अनिशविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

जर दीप्तीने अनिशविरोधात जबाब दिला नाही तर ते त्याला ठार मारतील असे सांगत होते.

ती जेव्हा जेव्हा ऑफिसला जात होती तेव्हा तेव्हा वडील, चुलता आणि चुलत भाऊ तिचा पाठलाग करत असतं.

कित्येक वेळा तिचे चुलते आणि वडील रायफल घेऊनच तिच्यासोबत ऑफिसला जात असत.

२० फेब्रुवारी रोजी जेव्हा अनिश अटक होण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा मात्र, दीप्ती घर सोडून अनिशच्या घरी गेली.

त्यानंतर अनिशवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला गेला.

मात्र, दीप्तीने एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करून ‘माझे अपहरण केले नाही. मी स्वत:हून अनिशकडे आले आहे आणि आम्ही लग्न केले आहे.’

दीप्ती अनिशच्या घरी आल्यानंतर २८ मे रोजी गोरखपूर येथील महादेव मंदिरात त्यांनी लग्न केले.

त्याच दिवशी एका हॉटेलमध्ये त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह मित्रांना पार्टीही दिली.

राजकीय पार्श्वभूमी

अनिशचे कुटुंब गोरखपूरजवळील दुबौली गावात राहत होते. बहुसंख्य मागासवर्गींयांची लोकसंख्या असलेल्या या गावात अनिशचे भाऊ अनिल १० वर्षे सरपंच होते.

आता आरक्षण पडल्यानंतर अनिलची पत्नी सरपंच आहे. अनिशचे वडील आणि चुलते बँकॉक आणि सिंगापूर येथे नोकरी करून गावी परतले आहेत.

सरकारी नोकरी करणारे अनिश हे घरातील पहिलेच सदस्य आहेत.

दोघांनी केले होते रजिस्टर लग्न

अनिश आणि दीप्ती यांनी १२ मे, २०१९ रोजी कोर्टात रजिस्टर लग्न केले. गोरखपूर येथील कोर्टाने ९ डिसेंबर, २०१९ रोजी लग्नाला मान्यता दिली होती.

आम्ही दोघे सज्ञान होतो आणि स्वत: कमावत होतो त्यामुळे विरोध होणार नाही असे वाटत होते. जरी विरोध झाला तरी त्यांचे मन वळवू असे वाटत होते.

मात्र, मी माझ्या घरच्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केले, परंतु त्यांना ते पटले नाही, असे दीप्तीचे म्हणणे आहे.

अनिशसोबत लग्न झाल्यानंतर दीप्तीच्या घरच्यांनी तिचा मानसिक छळ करण्यास सुरूवात केला. कधी तिची आई आजारी पडत असे तर कधी वडील सांगत की, त्यांना ॲटॅक आला आहे.

माझे म्हणणे ऐक नाहीतर मी मरून जाईन, असे वडील म्हणत.

कधी कधी अनिशाला ठार मारण्याची धमकी देत असत. अनिशच्या जीवासाठी मी घरच्यांचे म्हणणे ऐकत असे.

मी काहीही करून अनिशला वाचवण्याचा प्रयत्न करत होते.

२४ जुलै रोजी हत्या

अनिश आणि त्याचे चुलते २४ जुलै रोजी कामानिमित्त बाहेर पडले. गोपालपूर येथे एका हार्डवेअर दुकानात काम झाल्यानंतर अनिश मोबाइलवर बोलत पुढे जात होता.

त्यावेळी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चुलते देवी दयाल हेही गंभीर जखमी झाले. चार बुरखाधारी हल्लेखोरांनी या दोघांवर हल्ला केला. याप्रकरणी अनिल चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून १७ कुटुंबीयांसह आणि चार अन्य अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात दीप्तीचे वडील नलिन मिश्र, भाऊ अभिनव मिश्र यांच्यासोबत मणिकांत, विनय मिश्र, उपेंद्र, अजय मिश्र, अनुपम मिश्र, प्रियंकर, अतुल्य, प्रियांशू, राकेश, राजेश, त्रियोगी नारायण, संजीव आणि चार अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यात दीप्तीचे चुलते मणिकांत मिश्र, विवेक तिवार, अभिषेक तिवारी आणि सन्नी सिंह यांना अटक केली आहे

हेही वाचा: 

पहा व्हिडिओ: डिंपल को सिम्पल नहीं समझनेका 

 

Back to top button