गुर्जर नेता किरोरी सिंह बैंसला यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमधील गुर्जर समाजाचे ज्‍येष्‍ठ नेते किरोरी सिंह बैंसल यांचे बुधवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपसून त्‍यांच्‍यावर उपचार सुरु होते. त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली २००७ आणि २००८ मध्‍ये राजस्‍थानमध्‍ये गुर्जर आरक्षणासाठी प्रदीर्घ आंदोलन झाले होते. ते गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे प्रमुख होते. जयपूरमधील मणिपाल हॉस्‍पिटलमध्‍ये त्‍यांच्‍यावर उपचार सुरु होते. बुधवारी रात्री त्‍यांनी अंतिम श्‍वास घेतला. ( Gurjer leader Bainsla )

बैंसला यांच्‍या जन्‍म राजस्‍थानमधील करौला जिल्‍ह्यातील मुंडिया गावात झाला. त्‍यांनी आपल्‍या कारकीर्दीची सुरुवात शिक्षक म्‍हणून केली. त्‍यांचे वडील भारतीय सैन्‍यदलात होते. त्‍यामुळे राजपूताना रायल्‍समध्‍ये ते भरती झाले. भारतीय सैन्‍यदलातून ते कर्नल म्‍हणून निवृत्त झाले होते.

Gurjer leader Bainsla : गुर्जर आरक्षणासाठी उभारला लढा

निवृत्त झाल्‍यानंतर त्‍यांनी समाजकार्य सुरु केले. गुर्जर समाजाच्‍या आरक्षणसाठी राजस्‍थानमध्‍ये त्‍यांनी चळवळ उभारली. बैंसला यांच्‍या नेतृत्‍वाखाली २००७ आणि २००८ मध्‍ये राजस्‍थानमध्‍ये गुर्जर आरक्षणासाठी प्रदीर्घ आंदोलन झाले. या आंदोलनात सुमारे ७० जणांचा मृत्‍यू झाला होता.

हेही वाचलं का? 

 

Exit mobile version