केंद्रीय धाडी हा केवळ गंमतीचा विषय : संजय राऊत | पुढारी

केंद्रीय धाडी हा केवळ गंमतीचा विषय : संजय राऊत

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या नागपुरातील घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांना केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे. केंद्रीय धाडी हा केवळ गंमतीचा विषय झाला आहे. ‘कर नाही त्याला डर कशाला’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील अनेक महत्त्वाच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू आहेत. यावर खासदार संजय राऊत म्हणाले, की केंदीय धाडी हा सध्या गंमतीचाच विषय झाला आहे. आम्ही दिलेल्या पुराव्यांवर कोणतीही कारवाई  का नाही, असा प्रश्नही खासदार राऊत यांनी  उपस्थित  केला आहे.

काॅंग्रेस विषयी बोलताना राऊत म्हणाले, की यूपीए ही कोणाचाही खासगी मालमत्ता नाही. 2024 ची निवडणूक लक्षात घेऊन यूपीए पक्षाचा जिर्णोधार करणे गरजेचे आहे. जे नेते यूपीएच्या जिर्णोधारासाठी पुढाकार घेतील त्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असेल. काँग्रेसने जर प्रयत्नच केले नाहीत तर नेतृत्व दुसरीकडे जाण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली. यासाठी एनडीएतून बाहेर पडलेल्यांनेत्यांना एकत्र आणण्याबद्दल चर्चेला सुरूवात झाली असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

हेही वाचलत का ?

 

Back to top button