IAS टॉपर टीना डाबी होणार महाराष्ट्राची सून ! जाणून घ्या होणारे पती आहेत तरी कोण ?

टिना दाबी करणार पुन्हा लग्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : यूपीएससी टॉपर आयएएस टीना डाबी पुन्हा लग्न करणार आहे. यावर त्यांनी स्वतः खुलासा केला आहे. टीना डाबी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर 2013 बॅचचे आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी कमेंटदेखील केली आहे. यात त्यांनी लिहिले आहे की- ‘तुम्ही दिलेला आनंद मी स्वीकारत आहे’

गेल्या वर्षी झाला होता घटस्फोट

टीना डाबी यांनी यापूर्वी 2018 मध्ये त्यांच्याच बॅचमधील आयएएस अधिकारी अथर अमीर खान यांच्याशी लग्न केले होते. अथर अमीर यांनी २०१६ च्या यूपीएससी परिक्षेत दुसरा क्रमांक मिळवला होता. मात्र, या दोघांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. टीना डाबी आणि अथर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करून एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला होता.

प्रदीप यांचेही दुसरे लग्न

प्रदीप गावंडे यांचेदेखील हे दुसरे लग्न आहे. ते चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिले आहेत. प्रदीप यांनी आयएएस होण्यापूर्वी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. मीडिया रिपोर्टनुसार दोघेही 22 एप्रिलला जयपूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत.

टीना डाबी आणि अथर यांची मसुरीमध्ये झाली होती ओळख

मसुरीमध्ये आयएएस प्रशिक्षणादरम्यान टीना डाबी आणि अथर यांच्यात जवळीकता वाढली होती. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही राजस्थान केडरचे अधिकारी होते. मात्र, घटस्फोटानंतर अथर यांनी आपला कॅडर बदलला आणि जम्मू-काश्मीर या आपल्या मूळ राज्यात परतले.

टीना यांनी त्यांच्या आडनावातून खान काढून टाकलं

लग्नानंतर टीना यांनी त्यांच्या आडनावासमोर खान आडनाव लावले होते. घटस्फोटाच्या याचिकेच्या काही वेळापूर्वी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्या नावामधून खान आडनाव काढून टाकले. दरम्यान, अथर यांनीदेखील टीनाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले. टीना दाबी यांचे वडील जसवंत डाबी आणि आई हिमानी हे इंजिनिअर आहेत. टिना यांचे कुटुंब जयपूरचे असले तरी त्यांचा जन्म भोपाळमध्ये झाला आहे. जेव्हा त्या सातवीत शिकत होत्या तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीला स्थलांतर झाले.

14 लाखांहून अधिक फॉलोअर्स

टीना डाबी 2015 च्या आयएएस टॉपर असल्याामुळे त्या नेहमी चर्चेत राहिल्या. यानंतर, त्याच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रेरणादायी पोस्ट शेअर केल्यानंतर, त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या 1.4 दशलक्षांवर पोहोचली आहे. टीना यांचा जन्म भोपाळ (मध्य प्रदेश) येथे झाला. सध्या टीना जयपूरमध्ये वित्त विभागात सहसचिव आहेत.

हेही वाचा

Exit mobile version