मणिपूरमध्ये भाजपची एकहाती सत्ता | पुढारी

मणिपूरमध्ये भाजपची एकहाती सत्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूर विधानसभा निवडणुकीचे बहुतेक सर्व निकाल स्पष्ट झाले आहेत. ६० जागांपैकी भाजपचे (bjp ) ३२ उमेदवार निवडून आले असून एकहाती सत्ता मिळवण्याचा भाजपचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपकडे सत्ता कायम राहणार आहे. तर काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एनपीपी ८ आणि इतर एनपीएफ ५ जागांवर आघाडीवर आहेत.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत २८ जागा मिळवून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, काँग्रेसच्या काही आमदारांना फोडून भाजपने सत्ता स्थापन केली होती. या निवडणुकीत भाजपने ३२ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : घरातल्‍यांचा जुगनू, कॉमेडीयन आणि ‘आप’चा भगवंत | Bhgavant Mann | Aap CM Candidate

Back to top button