कर्नाटक राजकारण : बी.एस. येडियुराप्पा यांना राजीनामा का द्यावा लागला? - पुढारी

कर्नाटक राजकारण : बी.एस. येडियुराप्पा यांना राजीनामा का द्यावा लागला?

बंगळूरु; पुढारी ऑनलाईन : कर्नाटक राजकारण : कर्नाटकात पुन्हा राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. 78 वर्षीय बी. एस. येडीयुराप्पा यांनी विधानसभेत भावनिक भाषण केले. ज्यात ते म्हणाले की, दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांची कठिण परीक्षा झाली.

ते म्हणाले, ‘जेव्हा अटलबिहारी पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी मला केंद्रात मंत्री होण्यास सांगितले होते, परंतु मी कर्नाटकातच राहू असे सांगत मी ऑफर मी नाकारली. कर्नाटकात भाजप मोठा झाला आहे. इथे नेहमीच माझी अग्नीपरीक्षा होत होती. गेल्या दोन वर्षांत कोविड परीक्षा घेत होता.

कर्नाटक राजकारण : एका आठवड्यापासून राजकीय ड्रामा

मुख्यमंत्रिपदाबाबत कर्नाटकात एका आठवड्यापासून राजकीय ड्रामा सुरु झाला आहे. येडियुराप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना या पदावरून हटवण्यासाठी हालचाली सुरु केल्या असल्याची चर्चा रंगली होती.

कर्नाटकमधील लिंगायत समुदायातील भाजप नेते येडियुरप्पा यांच्याबाबतीत गेल्या आठवडाभर चर्चा सुरु होत्या. त्यांनी सतत ताठर भूमिका घेतली होती आणि पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरु होत्या.

बी.एस. येडियुराप्पांबद्दल दोन प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना हाय कमांडने राजीनामा देण्यास राजी केले.

आणि दुसरे म्हणजे येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्यास तयार होण्याचे मान्य केले असले तरी ते कदाचित आपल्या निर्णयावर ठाम राहणार नाहीत.

कारण येथे येडियुराप्पा यांनी काही महत्त्वपूर्ण विधानं केली आहेत. उदाहरणार्थ, पक्ष संघटना बळकट करून, त्यांना पुढील निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला जिंकायचे आहे. म्हणजेच त्यांचा डोळा प्रदेशाध्यक्षपदावर आहे जे सध्या नलिन कटील हे सांभाळत आहेत.

यासह येडियुरप्पा यांना त्यांचा मुलगा बिजेंद्र यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी इच्छा आहे.

हे ही वाचलं का? 

Back to top button