राहुल गांधी : सरकारच्या चुकीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५० लाख जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर खूप गंभीर आरोप केला आहे. बुधवारी राहुल गांधी यांनी सरकारवर चुकीच्या निर्णयाने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशातील 50 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.

ट्विटरवर एक अहवाल शेअर करताना राहुल गांधी म्हणाले की, सत्य हे आहे की सरकारच्या चुकीच्या निर्णयाने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ५० लाख माता, भगिनी, भाऊ आणि वडिलांनी आपला जीव गमावला.

भारत सरकारने कोविड-१९ मध्ये ४ लाख १४ हजार लोकांच्या मृत्यूची अधिकृतपणे खातरजमा केली आहे.

अमेरिका स्थित सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटचा रिपोर्ट

अमेरिकास्थित सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट या संस्थेचा राहुल गांधी यांनी एक अहवाल शेअर केला आहे. या अहवालात सविस्तर अभ्यासासाठी तीन वेगवेगळ्या स्रोतांकडून डेटा घेण्यात आला आहे.

त्या आधारे हे सांगण्यात आले आहे की जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान भारतात मृत्यूची संख्या ३४ ते ४७ लाखांपर्यंत असू शकते. याच काळात मागील वर्षांच्या तुलनेत ही संख्या दहा पट जास्त आहे.

संशोधकांनी सात राज्यांमधील मृत्यूच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. एकत्रितपणे, भारताच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्या या सात राज्यात राहते.

भारत दरवर्षी मृत्यूच्या आकडेवारीवर सर्वेक्षण करतो, परंतु आतापर्यंत केवळ २०१९ पर्यंतची आकडेवारी सार्वजनिक केली गेली आहे. अमेरिकन संशोधकांनीही सेरो सर्वेक्षण डेटाचा अभ्यास केला आहे.

सेरो सर्वेक्षण म्हणजे देशभरात घेण्यात आलेल्या दोन अँटीबॉडी चाचण्यांचा डेटा.

आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषाणूमुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येशी ही तुलना केली गेली. भारतातील एक लाख ७७ हजार घरांमध्ये राहणाऱ्या आठ लाख ६८ हजार लोकांच्या सर्वेक्षणातील माहिती घेण्यात आली.

गेल्या चार महिन्यांत घरातील कोणत्याही सदस्याचा मृत्यू झाला होता का, असेही या सर्वेक्षणात विचारण्यात आले.

मृत्यूचा अंदाज लावण्यासाठी सेरो सर्व्हेच्या आधारे संसर्ग दर वापरण्याचीही खबरदारी वैज्ञानिकांनी घेतली आहे.

हे संशोधन भारताचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात भारतातील भीषण भयानक चित्रे पाहिली गेली.

कारण कोरोना व्हायरसने देशावर अभूतपूर्व संकट कोसळले. केवळ रुग्णालये आणि ऑक्सिजन सिलिंडरच संपले नाहीत तर अंत्यसंस्कारासाठी लोक रांगेत उभे राहिले.

वास्तविक चित्र वाईट आहे

अहवालात असे म्हटले आहे की, मृतांची संख्या हजारो नव्हे तर लाखोंमध्ये आहे ही खेदाची बाब आहे.

तथापि, अहवालातील लेखकांनी स्पष्ट केले की बहुतेक मृत्यू केवळ कोविडमुळे झाले असावेत असे नाही.

ते म्हणाले की, आम्ही मृत्यूची सर्व कारणे मोजत होतो आणि साथीच्या आधी होणाऱ्या मृत्यूच्या सरासरीच्या तुलनेत आम्ही एक अंदाज लावला आहे.

भारत सरकारने अद्याप या अहवालावर भाष्य केले नाही.

हे ही वाचलं का? 

Back to top button