भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरण : चालक सेवक आणि केअर टेकर न्यायालयाकडून दोषी | पुढारी

भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरण : चालक सेवक आणि केअर टेकर न्यायालयाकडून दोषी

इंदूर ; पुढारी ऑनलाईन

भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात इंदूर न्यायालयाने भय्यूजी महाराज यांच्या चालक, सेवक आणि केअरटेकरला दोषी ठरवले आहे. त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप न्यायालयाकडून ठेवण्यात आला आहे. भय्यूजी महाराज यांनी २०१८ मध्ये स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.

या घटनेने त्यांचे कुटुंबीय आणि अनुयायांना मोठा धक्‍का बसला होता. त्यांच्या आत्महत्येमागे विविध कारणे सांगितली जात होती. भय्यूजी महाराज डॉ. आयुषी या त्यांच्या दुसर्‍या पत्नी आहेत, तर कुहू ही त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वी भय्यूजी महाराज आणि डॉ. आयुषी यांचा विवाह झाला होता. मात्र, डॉ. आयुषी व कुहू यांच्यात भांडणे होत असल्याने भय्यू महाराज अस्वस्थ होते. दुसर्‍या बाजूला भय्यूजी महाराजांचा सेवक विनायक हा पंधरा वर्षांहून अधिक काळ त्यांच्यासोबत होता.

Back to top button