पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट : राज कुंद्राने कमवले लाखाे, अभिनेत्रींना १० हजार... | पुढारी

पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट : राज कुंद्राने कमवले लाखाे, अभिनेत्रींना १० हजार...

मुंबई;पुढारी ऑनलाईन : राज कुंद्रा पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरण उघडकीस आल्‍याने बॉलीवूडमध्‍ये खळबळ माजली आहे. पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टीचा पती राज कुंद्राच्‍या ऑफिसची झडती घेतली. यावेळी आक्षेपार्ह साहित्‍यासह ठाेस पुरावेही पाेलिसांना मिळाले आहेत.

अधिक वाचा 

फेब्रुवारी महिन्‍यातच एका मॉडलने पॉर्न व्‍हिडिओ रॅकेटमध्‍ये राज कुंद्राचा सहभाग असल्‍याचा गौप्‍यस्‍फोट केला होता.

या वेळी त्‍याने सर्व आरोप फेटाळले. तसेच मी निर्दोष आहे, असा दावाही केला हाेता.

बॉलीवूड हिरॉईन होण्‍याचे स्‍वप्‍न घेवून दररोज शेकडो तरुणी मुंबईत येतात.

चित्रपट असो कि टीव्‍ही शो यामध्‍ये काम मिळवण्‍यासाठी त्‍यांचा संघर्ष सुरु होताे. काेराेना काळात  मोबाईल ॲपच्‍या माध्‍यामातून ओव्‍हर टू टॉप (ओटीटी) प्‍लॅटफॉर्म कमालीचा यशस्‍वी झाला आहे. याचाच फायदा घेत या प्‍लॅटफॉर्मवर पॉर्न व्‍हिडिओची चलती सुरु झाली आहे.

अधिक वाचा 

पॉर्न व्‍हिडिओ पाहणार्‍या  देशांमध्‍ये भारत हा  जगातील तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. यामुळेच या व्‍यवसायात काेट्यवधीचा फायदा हाेईल, हे राज कुंद्राने हेरले. यानंतर त्‍याचा ‘पॉर्न व्‍हिडिओ’चा व्‍यवसाय सुरु झाला.

नवोदित अभिनेत्रींना वेब सीरीजमध्‍ये काम देण्‍याचे आमिष

राज कुंद्रा पॉर्न (अश्‍लील) व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मिळालेल्‍या माहितीनुसार, राज कुंद्राची टीम मुंबईत नवोदित अभिनेत्रींचा शोध घेत असे. त्‍यांना पॉर्न व्‍हिडिओसाठी बोल्‍ड सीन दिल्‍यानंतर वेब सीरीजमध्‍ये काम मिळेल, असे आमीष दाखवले जात असे.

कामाची गरज असणार्‍या अभिनेत्री या रॅकेटमध्‍ये सापडत. बोल्‍ड सीनचे चित्रीकरण करण्‍यात येत असे. यानंतर हेच बोल्‍ड सीन वेबसाईटसह ॲपवर अपलोड केले जात.

अधिक वाचा 

राज कुंद्राला अटक केल्‍यानंतर अभिनेत्री व मॉडल सागरिका सोना सुमनची मुलाखत सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.

बेबसीरीजच्‍या नावाखाली मलाही पॉर्न व्‍हिडीआमध्‍ये काम करावे, अशी ऑफर देण्‍यात आली होती. मात्र मी यास स्‍पष्‍ट नकार दिला होता, असे तिने मुलाखतीमध्‍ये म्‍टहलं आहे.

कंपनीची नाेद परदेशात ‘पाॅर्न व्‍हिडिओ’ निर्मिती देशात

राज कुंद्रा याचे निकटवर्तीच पार्न व्‍हिडिओ प्रसारित करणार्‍या ॲपची निर्मिती करत असत. कुंद्राचा सहकारी उमेश कामत याला अटक केल्‍यानंतर ही बाब उघड झाली. भारतीय सायबर कायद्‍यातून सुटका व्‍हावी, याच हेतूने त्‍याने इंग्‍लंडमध्‍ये फर्म विआन ही कंपनी सुरु केली.

या कपंनीचा इंग्‍लंडमधील कंपनी केनरिनबरोबर करार होता. केनरिन कंपनी ही राज कुंद्राच्‍या बहिणीच्‍या नवर्‍याची आहे.

‘हॉट शॉट’ॲपच्‍या माध्‍यमातून पार्न व्‍हिडिओ अपलोड आणि स्‍ट्रीम करत असे. इंग्‍लंडमधील ‘हॉट शॉट’ कंपनीला विआन कंपनीच चालवत होती.

पार्न व्‍हिडिओ प्रसारीत केल्‍यामुळे हॉटशॉट ॲपला जून २०२० मध्‍ये ॲपल स्‍टोरवरुन तर नोव्‍हेंबर २०२०मध्‍ये गूगल प्‍ले स्‍टोरवरुन हटविण्‍यात आले. यानंतर कुंद्राने वेगवेगळ्या ॲपचा वापर करुन पॉर्न व्‍हिडिओ अपलोड आणि स्‍ट्रीम केले.,

साडेसात कोटींची संपत्ती जप्‍त

विआन कंपनीच्‍या कार्यालयाची झडतीमध्‍ये पोलिसांनी साडेसात कोटींची संपत्‍ती जप्‍त केली आहे.त्‍याचबरोबर कंपनीच्‍या आयटी प्रमुखाला अटक केली आहे.

कुंद्राने कमावले लाखो रुपये, अभिनेत्रींना केवळ १० हजार

राज कुंद्राने पार्न व्‍हिडिओ निर्मितीमधून लाखो रुपये कमवले. तर यामध्‍ये काम करणार्‍या अभिनेत्रींना तो केवळ आठ ते १० हजार रुपये देत असे, अशीही माहिती पाेलिस तपासात समाेर आली आहे.

दररोज होत होती १.८५ लाखांची कमाई

हॉटशॉट ॲपवर एकुण २० लाख ग्राहक होते. पार्न व्‍हिडीओच्‍या माध्‍यमातून राज कुंद्रा दररोज १.८५ लाखांची कमाई करत असे. व्‍हॉटस ॲप चॅटच्‍या माध्‍यमातून ही माहिती समोर आली आहे. अश्‍लील चित्रपटातून तो दररोज ४.५३ लाख रुपये कमवत असे, असे तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ :200 वर्षे जुने बंगले असणारं मुंबईतलं म्हातारपाखाडी |

 

Back to top button