वर्धा : अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली हळहळ | पुढारी

वर्धा : अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली हळहळ

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील सेलुसरा येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून  (PMNRF) मदतीची घोषणाही केली आहे. “महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो, अशी भावना पंतप्रधानांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून सेलूसरा जवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची. तर, या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत देण्याची घोषणा देखील पंतप्रधानांकडून करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलसुराजवळ ‘झायलो’ कार नदीत कोसळली. या अपघातात एमबीबीएसच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
भाजप आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही त्यात समावेश आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत असलेले कठडे तोडून गाडी नदीवरील जुन्या आणि नवीन पुलाच्या मध्यभागी जवळपास ४० फूट खाली कोसळली.

हे ही वाचलं का 

Back to top button