उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसला (Congress) मंगळवारी मोठा झटका बसला आहे. यूपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कुंवर रतनजीत प्रताप नारायण सिंह म्हणजेच आरपीएन सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे एक दिवस अगोदरच काँग्रेसने त्यांना उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारात स्टार प्रचारक बनवले होते. पदरौना राजघराण्याचे राजा आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपचे (BJP) सदस्यत्व घेतल्यानंतर आरपीएन सिंह म्हणाले, “भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, आपल्या देशाचे प्रसिद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी, मला भाजप परिवारात समाविष्ट केल्याबद्दल मी गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. आपल्या माननीय पंतप्रधानांनी काही वर्षांत प्राचीन संस्कृतीला 21 व्या शतकाशी जोडून राष्ट्र उभारणीसाठी केलेल्या कार्याचे संपूर्ण देश कौतुक करत आहे.

32 वर्षे  एकाच पार्टीत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने मेहनत घेतली पण…

आरपीएन सिंह म्हणाले,  32 वर्षे मी एका पार्टीत होतो. प्रामाणिकपणे आणि निष्ठेने मेहनत घेतली. पण एवढी वर्षे ज्या पक्षात राहिला तो पक्ष आता नाही, विचारही नाही. राष्ट्र उभारणीसाठी जे काही शक्य आहे ते मी करेन. अनेक वर्षांपासून लोक मला सांगत होते की तुम्ही भाजपमध्ये जा. बराच वेळ विचार केला पण खूप उशीर झाला. यूपीमध्ये आज निवडणुका सुरू आहेत, आणखी चार राज्यांमध्ये निवडणुका आहेत. यूपी हे भारताचे हृदय आहे. गेल्या सात वर्षांत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात ज्या मोठ्या योजना झाल्या, त्या संपूर्ण उत्तर प्रदेशाने पाहिल्या आहेत. दुहेरी इंजिन सरकारने गेल्या पाच वर्षांत ज्या प्रकारच्या मोठ्या योजना केल्या, मला अभिमान आहे की मी पूर्वांचलचा आहे, जी स्वप्ने होती ती आज सत्यात उतरली आहेत.

आरपीएन तीनदा आमदार (MLA) आणि एकदा खासदार झाले आहेत. ते काँग्रेसच्या कोअर कमिटीत होते. ते झारखंडचे प्रभारी होते. त्यांनी आरपीएन काँग्रेसमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. आरपीएन सिंह यांच्या पत्नी सोनिया सिंह भाजपच्या तिकिटावर पडरौनामधून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. या जागेवरून स्वामी प्रसाद मौर्य हे देखील निवडणूक लढवणार आहेत. आरपीएन सिंह यांना भाजप राज्यसभेवर पाठवू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

काँग्रेसने सांगितले सत्य

काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आरपीएन सिंह यांना त्यांच्या जुन्या पक्षाचा मोठा फटका बसला. त्यांच्यावर हल्लाबोल करताना पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या की, हा मोठा लढा आहे. डरपोक ते लढू शकत नाहीत. सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या की, प्रियांका गांधी म्हणतात की डरपोक ही लढाई लढू शकत नाही. तो कोठेही जात असला तरी त्याच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आशा करतो की कदाचित कालांतराने त्याला हे समजेल की उत्साहाने लढणे हे शौर्याचे चिन्ह आहे.

हे ही वाचलं का

Back to top button