अभिजीत बिचुकले म्हणतो, "...असे १०० सलमान गल्ली झाडायला दारात ठेवतो" - पुढारी

अभिजीत बिचुकले म्हणतो, "...असे १०० सलमान गल्ली झाडायला दारात ठेवतो"

सातारा, पुढारी ऑनलाईन : बिग-बाॅस १५ मधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकलेने सलमान खानची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. “सलमान खान अजून अंड्यात आहे. तो अंड्याबाहेर आलेला नाही. त्याला अभिजीत बिचुकले कोण आणि कोणाशी पंगा घेतोय आहे, हे कळेल. त्याला काय ते दिल्लीवरून आलेला गायक वैगेरे वाटले का? असले शंभर सलमान मी गल्ली झाडायला दारात उभं करेन”, अशा संतप्त शब्दांत अभिजीत बिचुकलेने सलमान खानवर टीका केली आहे.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अभिजीत बिचुकलेने टीका केली आहे. बिचुकले म्हणाला, “मी स्वत:हून बाहेर पडायला लागलो होतो. मी जेव्हा बाहेर पडणार होतो तेव्हा बिग बॉसने विनंती करुन थांबवलं होतं. आता त्यांच्या नियमानुसार काढलं आहे. याबद्दल मला काही शंका आणि मनात गोष्टी आहेत. त्या मी पत्रकार परिषदेत मांडणार आहे”, अशीही माहिती बिचुकलेने दिली.

“संपूर्ण जगानं पाहिलं तसं तेथील काही लोक जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप करत होते. आमची मोठी भांडणं झाली होती, त्यात मी शिवी दिली हे तर जगजाहीर आहे. त्याच्यानंतर मग सलमान खानने माझ्यावर जो काही राग प्रकट केला ते न शोभणारं आहे. त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे”, असंही बिचुकलेने म्हंटलं आहे.

अभिजीत बिचुकले म्हणाले, “सलमान खानला माझा मत्सर निर्माण झाला. त्याला कोणी मोठं झालेलं पहावत नाही. त्याचा इतिहास पहा. माझं झालेलं कौतुक त्याला पहावलं नाही. त्याला वाटतं की तोच शो चालवतो. त्याने १४ सीझन चालवले असतील, पण माझं आव्हान आहे की हा सीझन मी चालवणार. सलमान खान कमी पडला म्हणून त्याचा मत्सर जागा झाला आणि माझ्यावर चिडला. त्याचं उत्तर मला द्यायचं आहे. कारण आत असताना त्याने जी भाषा वापरली ना ती भाषा माझ्यासोबत महाराष्ट्रात कोणीही वापरली नाही. वाघ पिंजऱ्यात होता म्हणून तो चाबूक फिरवत होता. पण आता वाघ बाहेर येतोय”, असंही त्यांनं म्हंटलं आहे.

Back to top button