charanjit singh channi : हेच अवैध वाळू उत्खननाचे मास्टरमाईंड; विक्रम सिंग | पुढारी

charanjit singh channi : हेच अवैध वाळू उत्खननाचे मास्टरमाईंड; विक्रम सिंग

चंदीगड; वृत्तसंस्था : अवैध वाळू उत्खननाचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी ( charanjit singh channi ) मास्टरमाईंड असून, त्यांच्या इशार्‍यावर भाचा भूपिंदर सिंग हनी अवैधपणे वाळू उत्खन्नन करत असल्याचा आरोप अकाली दलाचे नेते विक्रम सिंग ( Bikram Singh Majithia ) यांनी केला आहे.

चन्नी ( charanjit singh channi ) यांनी भूपिंदर सिंग याला आपल्या सुरक्षा ताफ्यातील कमांडो आणि जिप्सीही दिली असल्याचा आरोप विक्रम सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी चन्नी यांच्या घरावर छापेमारी करण्याची गरज आहे. भूपिंदर सिंग आणि त्याच्या साथीदाराच्या घरावर छापेमारी करून ईडीने 10 कोटींची रोकड, 21 लाखांचे सोने आणि 12 लाखांचे एक घड्याळ जप्त केले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात ऐवज सापडूनही केंद्र सरकारने भूपिंदर सिंग याच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल विक्रम सिंग यांनी केला आहे.

सिद्धू यांच्यावरही टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू ( navjot singh sidhu ) अवैध वाळू उत्खननावर खूप बोलत होते. ईडीने भूपिंदर सिंग यांच्या घरावर छापेमारी करून सिद्धू यांचा बुरखा फाडला आहे. सिद्धू भूपिंदर सिंग यांना पाठीशी घालत असल्याची टीका विक्रम सिंग यांनी केली.

 

Back to top button