देशातील १० राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित - पुढारी

देशातील १० राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

आशियात गेल्या चार आठवड्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत ७.९ टक्क्यांवरून तब्बल १८.४ टक्क्यांची तीव्र वाढ नोंदवण्यात आली आहे. भारतातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली.

महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान या १० राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटे दरम्यान मृत्यूदर बराच कमी असल्याचे देखील भूषण म्हणाले. दुसऱ्या लाटेदरम्यान केवळ २ टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आले होते. तिसऱ्या लाटे दरम्यान हे प्रमाण ७२% असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. १ जानेवारी २०२२ रोजी असलेला देशाचा कोरोनासंसर्गदर २ टक्क्यांवरून १६ टक्क्यांपर्यंत पोहचला.

गेल्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक,तामिळनाडू, केरळ आणि उत्तर प्रदेशात कोरोना तपासण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेदरम्यान सौम्य लक्षणासह पाच दिवसांमध्ये रुग्ण बरे होत असल्याचे दिसून येत आहे. ११ ते १८ वर्षांतील मुलांमध्ये ताप सर्वसामान्य आहे. पंरतु, संसर्ग फुफ्फुसामध्ये पोहचत नसल्याचे देखील ते म्हणाले. १५ ते १८ वयोगटातील ५२% लोकसंख्येला पहिला डोस लावण्यात आला आहे. तर, देशातील ६.५ कोटी लोकांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही.

महत्वाचे…

  • ५० हजारांहून अधिक सक्रिय कोरोनाबाधित असलेले राज्य- ११
  • १० ते ५० हजार सक्रिय कोरोनाबाधित असलेले राज्य- १३
  • १० हजारांहून कमी सक्रिय कोरोनाबाधित असलेले राज्य-१२
  • संसर्गदर ५ टक्क्यांहून कमी असलेले जिल्हे- ५१५

हे ही वाचलं का ?

Back to top button