मल्ल्याचे लंडनमधील घर स्विस बँकेच्या ताब्यात | पुढारी

मल्ल्याचे लंडनमधील घर स्विस बँकेच्या ताब्यात

लंडन : बँकांना गंडवून भारतातून पळून गेलेला एकेकाळचा मद्यसम्राट विजय मल्ल्या याचे लंडनमधील आलिशान घरही त्याच्या हातून आता गेले आहे. स्विस बँक ‘यूबीएस’सोबत चाललेल्या कायदेशीर लढाईत अखेर मल्ल्याला मात खावी लागली आहे. ब्रिटिश न्यायालयाने मल्ल्याला हे घर खाली करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला स्थगिती द्यावी, ही मल्ल्याची मागणी ब्रिटिश न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मल्ल्याचे हे घर ‘यूबीएस’च्या ताब्यात जाणार आहे.

हेही वाचा :

Back to top button