प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन - पुढारी

प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रख्यात कथ्थक नर्तक आणि पद्मविभुषण विजेते  पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांते नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. गायक अदनान सामी यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली.

अदनान सामी ट्वीट करत लिहिले की, “महान कथ्थक नृत्य कलाकार पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाच्या बातमी मनाला चटका लावणारी आहे. आज आपला लोकांनी कला क्षेत्रातील एक मोठ्या संस्थेला गमावलं आहे. त्यांनी प्रतिभेतून कित्येक पिढा प्रभावित केल्या आहेत.”

Koo App

भारतीय कला-संस्कृति को कथक नृत्य शैली के माध्यम से संपूर्ण विश्व में प्रसिद्धि दिलाने वाले कथक सम्राट पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज जी का निधन अत्यंत दुःखद है। उनको मेरी भावभीनी श्रद्धांजलि। पंडित बिरजू महाराज जी का निधन कला जगत एवं देश के लिए अपूरणीय क्षति है। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे और परिजनों को संबल दे। ॐ शांति

Nitin Gadkari (@nitin.gadkari) 17 Jan 2022

बिरजू महाराज यांचा जीवन परिचय

लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ लखनऊ येथे झाला. ते कथ्थक नृत्य कलाकार होते, त्याचबरोबर ते शास्त्रीय गायकदेखील होते. त्यांचे वडील अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हेदेखील प्रसिद्ध कथ्थक नृत्य कलाकार होते.

बिरजू महाराज यांनी देवदास, डेढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटात डान्स कोरिओग्राम केले होते. शिवाय सत्यजीत राय यांच्या शतरंज के खिलाडी यामध्ये संगीतदेखील दिले होते. १९८३ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Koo App

प्रख्यात कथ्थक नर्तक पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचे निधन झाले.ही बातमी अतिशय दुःखद आहे. महाराष्ट्राला पिता आणि बंगालला माता मानणाऱ्या पंडितजींनी आयुष्यभर कलेची साधना केली. लखनवी घराण्याचे कथ्थक जगभर पोहोचविले.त्यांच्या निधनामुळे भारतीय कला विश्वातील एक चमकता तारा निखळला.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Supriya Sule (@supriya_sule) 17 Jan 2022

काशी हिंदू विश्वविद्यालयातून बिरजू महाराज यांना डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले होते. २०१२ साली विश्वरुपम फिल्म डान्स कोरिओग्राफीसाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१६ मध्ये बाजीराव मस्तानी या चित्रपटातील ‘मोहे रंग दो लाल’ गाण्याची कोरिओग्राफीकरिता फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला.

पहा व्हिडिओ : सांगलीच्या मॅकॅनिकचा जुगाड! भंगारातून ३० हजारांत बनवली ‘फोर्ड कार’

हे वाचलंत का?

Back to top button