Uttar Pradesh election : मकरसंक्रांतीनंतर कॉंग्रेस घोषित करणार पहिली यादी | पुढारी

Uttar Pradesh election : मकरसंक्रांतीनंतर कॉंग्रेस घोषित करणार पहिली यादी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा 

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी (Uttar Pradesh election) कॉंग्रेसची तयारी सुरु झाली असून पहिली निवडणूक यादी मकर संक्रांतीनंतर घोषित करण्यात येणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेश व बुदेलखंडमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून जवळजवळ 100 ते 125 उमेदवारांचे नाव या निवडणूकीसाठी निश्चित केले जाणार आहे. (Uttar Pradesh election)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, कॉंग्रेस हायकमांडने जवळपास 200 ते 225 जणांचे टिकीट निश्चित केले आहे. यातील जास्तीतजास्त उमेदवारांना आपआपल्या मतदारसंघात जाऊन तयारी करण्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही, पहिल्या टप्प्यात 96 जागांसाठी लढत होणार असल्याने पार्टीच्या रणनितीनुसार, पहिले याच जागांसाठी उमेदवार घोषित केले जाणार आहेत. यातील काही उमेदवार दुस-या टप्प्यातील असू शकतात. कॉंग्रेसने सर्वच उमेदवारांना आपआपल्या मतदारसंघात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

प्रियंका गांधींचा नवा प्रयोग

प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh election) निवडणूकांना लक्ष ठेवून 40 टक्के महिलांना टिकीट देण्याचा निर्णय व ‘लडकी हूं लड सकती हूं’ असा नारा देत एक नवा प्रयोग केला आहे. यानुसार ज्या महिलांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा महिलांची नावे कॉंग्रेसने निश्चित केली आहे.

कॉंग्रेस महासचिव व प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी या महिलांना उत्तरप्रदेश निवडणुकीत संधी देऊ पाहत आहेत. त्यानुसार या महिलांना व त्यांच्या परिवारास भेटून त्यांचे मत जाणून घ्यावे व त्यांना निवडणूक लढविण्यासाठी राजी करावे अशा सूचना प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. एवढेच नाहीतर, या महिलांच्या निवडणुकीचा खर्चही कॉंग्रेस करणार आहे.

हेही वाचा :

व्हिडिओ पहा :

राजर्षी छ. शाहू महाराज आणि एका शेणीवालीची गोष्ट

Back to top button