नरभक्षक लांडगे! मुलांवर हल्ला करुन फरफटत नेतात, ३५ गावांत दहशत, ८ मृत्यू

Wolf Attack Bahraich | यूपीतील बहराइच जिल्ह्यात लांडग्यांना पकडण्यासाठी २५ पथके तैनात
Wolf Attack Bahraich
उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यातील ३५ गावांत नरभक्षक लांडग्यांची दहशत आहे.(File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बहराइच जिल्ह्यातील (Wolf Attack Bahraich) ३५ गावांत नरभक्षक लांडग्यांची दहशत आहे. गेल्या ४५ दिवसांत लांडग्यांच्या हल्ल्यात येथील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ६ मुलांचा समावेश आहे. नरक्षक लांडग्यांना पकडण्यासाठी वन विभागाची २५ पथके त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी येथे एका लांडग्याला बहराइच वन विभागाने पकडले. येथील वनविभागाने याआधीच तीन लांडग्यांना पकडले होते. चौथ्या लांडग्याला गुरुवारी सकाळी पकडले. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. सकाळी अकराच्या सुमारास त्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आले.

आतापर्यंत पकडलेल्या चार लांडग्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या म्हणण्यानुसार, दोन लांडग्यांचा अजूनही मुक्तपणे वावर सुरु आहे. बहराइच जिल्ह्यातील सुमारे ३५ किमी क्षेत्रात लांडग्यांचा वावर आहे. यामुळे ३२ गावांत पथके तैनात केली आहेत. लांडग्यांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारीही गावात तैनात आहेत. लांडग्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे गावात रात्रीचा पहारा दिला जात आहे.

तीन लांडग्यांचा उपद्रव

लखनौचे मुख्य वनसंरक्षक रेणू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडग्यांचे सतत हल्ले सुरु असून यात अनेक लोकांचा मृत्यूही झाला आहे. लांडग्यांच्या हल्ल्यात पाच जणांच्या मृत्यूंची पुष्टी झाली आहे. परंतु दोन मृत्यू संशयास्पद आहेत. त्यांची चौकशी केली जात आहे. तीन लांडग्यांचा उपद्रव सुरुच आहे. त्यासाठी आमचे पथक तैनात केले आहे. जोपर्यंत सर्व लांडगे पकडले जात नाहीत; तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही.

ड्रोन कॅमेऱ्यात लांडग्यांचा कळप कैद

लांडगा हा प्राणी धूर्त असतो. यामुळे त्याला पकडणे अवघड काम आहे. गेल्या ४७ दिवसांत लांडग्यांच्या हल्ल्यात ६ मुलांसह ८ गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २२ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, ड्रोन कॅमेऱ्यात सिसिया गावातील उसाच्या शेतात ३ लांडग्यांचा कळप दिसून आला होता.

आमदारही हातात बंदुक घेऊन....

दरम्यान, लांडग्यांना पकडण्यासाठी बहराइच येथील मेहसीचे आमदार सुरेश्वर सिंह खुद परवानाधारक बंदुक घेऊन फिरत आहेत. त्यांचे समर्थकदेखील हत्यारे घेऊन गावांत तळ ठोकून बसले आहेत. आम्हाला वन्य प्राण्याची हत्या करायची नाही. पण मी ज्या ४ लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत आहे; त्यांची सुरक्षा करणे माझी जबाबदारी आहे, असे आमदार सुरेश्वर सिंह यांनी म्हटले आहे.

'लांडग्याने मुलाच्या मानेला पकडून फरफरत नेले...'

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, लांडग्याने हल्ला केलेल्या फिरोज या सात वर्षांच्या मुलाच्या आईने आपबिती सांगितली. तिने म्हटले की, लांडगा रात्री त्यांच्या घरात घुसला आणि मुलाच्या मानेला पकडून त्याला फरफटत नेले. "मी लांडग्याचा पाय ओढून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण लांडग्याने फिरोजला सुमारे २०० मीटर शेतात ओढून नेले. मी आरडाओरड केला तेव्हा गावातील लोक जमा झाले. यामुळे शेवटी लांडगा मुलाला शेतात सोडून पळाला. मुलाला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर १३ दिवस उपचार करण्यात आले आणि तो वाचला."

खरंच लांडगा नरभक्षक प्राणी आहे का?

लांडगा हा कळपात राहणारा प्राणी आहे. त्याच्या तोंडात ४२ दात असतात. त्याचा जबडा मजबूत असतो. यामुळ तो शिकार केलेल्या प्राण्याची हाडेदेखील फोडून खातो. लांडगा हा जंगली प्राण्यांची शिकार करतो. पण बहराइच येथे अंगणात खेळणाऱ्या मुलांवर लांडगे हल्ला करत आहेत.

Wolf Attack Bahraich
गुजरातमध्ये अतिवृष्टी; २८ जणांचा मृत्यू, १८ हजार लोकांचं स्थलांतर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news