वृत्तपत्रांच्या समस्या सोडविणार; अश्विनी वैष्णव यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

Ashwini Vaishnaw | डॉ. योगेश जाधव यांच्यासह इतर सदस्य उपस्थित
Ashwini Vaishnaw Meet INS Members
इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.Pudhari News Network
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) शिष्टमंडळाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी वृत्तपत्रांसंबंधीच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा केली. या बैठकीला आयएनएसचे अध्यक्ष राकेश शर्मा, 'दै. पुढारी'चे समूह संपादक आणि पुढारी वृत्तसमुहाचे चेअरमन, आयएनएस कार्यकारिणी सदस्य डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

९ व्या दर संरचना समितीच्या शिफारशी, न्यूजप्रिंटवरील ५ टक्के सीमाशुल्क मागे घेणे, डिजिटल न्यूज सबस्क्रिप्शनवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मागे घेणे, इंग्रजी वृत्तपत्रांचा सीबीसीसह पॅनेलमेंटमध्ये भेदभाव, भारतीय वृत्तपत्रांचे संयुक्त राष्ट्र (यूएन) भाषांमध्ये भाषांतर, ई-पेपरसाठी स्वतंत्र दरांचा विचार, लेखापरीक्षित परिचलन प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ, प्रिंट मीडियासाठी सीबीसी बजेट पुनरावृत्ती, सीबीसीची थकबाकीसह इतर मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

शिष्टमंडळाने मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर केंद्रीय मंत्र्यांनी विचार केला आणि योग्य वेळी त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. आयएनएस च्या शिष्टमंडळाने बैठकीत चर्चा केलेल्या मुद्द्यांचे तपशीलवार निवेदनही केंद्रीय मंत्र्यांना सुपूर्द केले.

Ashwini Vaishnaw Meet INS Members
Rahul vs Swamy : ‘राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द करा’, सुब्रमण्यम स्वामींची दिल्ली हायकोर्टात याचिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news