नवजात मुलीला आईनेच फेकले उकिरड्यावर; वाशिम तालुक्‍यातील घटना

पोलिसांच्या प्रयत्नामुळे मुलीचे प्राण वाचले
The mother threw the newborn girl in the garbage; Incidents in Washim Taluka
नवजात मुलीला आईनेच फेकले उकिरड्यावर; वाशिम तालुक्‍यातील घटनाFile Photo
Published on
Updated on

वाशीम : अजय ढवळे

वाशिम तालुक्यातील वारला शिवारात अनसिंग रोडवर अज्ञात आईने नको असलेल्या नवजात मुलीचे अर्भक रस्त्यालगत उकिरड्यावर फेकून दिल्याची घटना आज (सोमवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती कळताच अनसिंग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नवजात मुलीचे अर्भक ताब्यात घेत वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सदर पोलिसांच्या प्रयत्नामुळे नवजात मुलीचे प्राण वाचले आहेत. अशा निर्दयी पद्धतीने उकीरड्यावर नवजात मुलीला टाकून जाणाऱ्या आईचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास अनसिंग पोलीस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news