वाशीम :
वाशीम शहर पोलीस स्टेशनच्या मागे 8 जणांच्या टोळक्याने दि.29 आगस्ट रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या दरम्यान एका युवकाला बेदम मारहाण करून त्याचा धारदार चाकुने वार करून खून केला. राहुल हिंमतराव वाघ (वय 29) असे या युवकाचे नाव असून, तो काटा येथील रहिवासी आहे. सदर घटना ही प्रेमप्रकरानातील एका युवतीच्या कारणावरुन वाद होवून झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत शहर पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक देवेंद्रसिहं ठाकूर यांनी तत्परतेने आपले कौशल्य पणाला लावून व कसून तपास करून 6 आरोपींना अटक केली. इतर 2 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
काल संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान वाशिम शहरामध्ये भरदिवसा एक धक्कादायक घटना घडली आहे. वाशीम शहर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे 8 जणांच्या टोळक्याकडून राहूल वाघ या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्या नंतर चाकुने सपासप वार करून राहुलला जखमी करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. यातच राहुलचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, शहर पोलीस, ग्रामीण पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले.
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, या प्रकरणात भागवत धोंगडे, वैभव गूंजकर, सचिन कोठेकर, सागर मापारी, विरेंद्र खडसे, गौरव गवळी, विश्वेश लेनबुते, अभिषेक इरतकर या 8 जणांचा सहभाग आहे. यातील 6 आरोपी पोलिसांनी अटक केले असून इतर 2 आरोपी मात्र फरार आहेत. त्या फरार संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी 8 जणांविरुद्ध विविध कलमान्वये वाशीम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वाशीम शहर पोलीस करीत आहेत.