वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आणि थायलंडमधील नाखोन रत्चासिमा राजभट विश्वविद्यालय यांच्यात शैक्षणिक सहकार्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. कृष्ण कुमार सिंह आणि नाखोन रत्चासिमा राजभट विश्वविद्यालयाचे अध्यक्ष एदिसोर्न नावोवानोंदा यांनी शुक्रवारी (दि.१३) सवांद कक्षामध्ये स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराचा उद्देश शैक्षणिक सहकार्य विकसित करणे आणि दोन्ही विश्वविद्यालयामधील परस्पर समंजसपणाला चालना देणे हा आहे.
दोन्ही विश्वविद्यालयांनी समानता आणि पारस्परिकतेच्या आधारावर परस्पर हिताच्या शैक्षणिक क्षेत्रात सहयोगी उपक्रम विकसित करण्याचे मान्य केले आहे. ज्यामध्ये प्राध्यापक सदस्यांची देवाणघेवाण, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन कार्यक्रम, संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम, संयुक्त परिषदा आणि कार्यशाळा, संयुक्त हिंदी सघन कार्यक्रम आणि इंग्रजी-हिंदी आणि इंग्रजी-हिंदी अनुवाद कार्यक्रम आणि इतर उपक्रम आयोजित केले जातील. हा सामंजस्य करार दोन्ही विश्वविद्यालयांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी केल्यापासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे. या सामंजस्य कराराचे दोन्ही विश्वविद्यालयांनी पुनरावलोकन आणि फेरनिविदा केल्यानंतर नूतनीकरण केले जाईल असा दोन्ही विश्वविद्यालयांचा मानस आहे.
या प्रसंगी थाइलैंड विविचे सहायक प्रोफेसर अर्नत जयसामरार्न, सहायक प्रोफेसर सिरिवादी, मयूरी कांता, सासासिरी, डोनलया, हिंदी विविचे कुलसचिव प्रो. आनन्द पाटील, श्री चमनलाल प्रवासन व डायस्पोरा अध्ययन विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. राजीव रंजन राय, अनुवाद व निर्वचन विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. श्रीनिकेत मिश्र, वित्ताधिकारी पी. सरदार सिंह, परीक्षा नियंत्रक कादर नवाज़ ख़ान, जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे, हिंदी अधिकारी राजेश कुमार यादव, पवन कुमार व उमाशंकर उपस्थित होते.