वर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणुकीसाठी २० नोंव्हेंबरला मतदान घेण्यात आले. मतदारानी उत्स्फुर्तपणे मतदान केल्यामुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातील ११ लाख ३२ हजार ३२६ मतदारांपैकी ७ लाख ८४ हजार ५५५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची एकूण टक्केवारी ६९.२९ टक्के आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात विक्रमी मतदान झाले.
यावेळी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. काही मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले. यात नवमतदार, महिला, दिव्यांग मतदार व जेष्ठ नागरिकांचा समावेश होता. प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर सोई सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. शांततामय वातावरणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६९.२९ टक्के मतदान झाले. आर्वी ७१.८६ टक्के, देवळी ६८.९६ टक्के, हिंगणघाट ७०.८७ टक्के, वर्धा विधानसभा मतदार संघात ६५.६८ टक्के मतदान झाले.
आर्वी मतदार संघात २ लाख ६५ हजार ४२० मतदार असून यामध्ये १ लाख ३३ हजार ५९८ पुरूष तर १ लाख ३१ हजार ८२० महिला असून २ इतर मतदारांचा समावेश आहे. यापैकी ९९ हजार ८२१ पुरुष मतदारांनी (७४.७२ टक्के), ९० हजार ९१० स्त्री (६८.९७ टक्के) मतदारांनी तर २ इतर (१०० टक्के) मतदारांनी असे १ लाख ९० हजार ७३३ (७१.८६ टक्के) मतदारांनी मतदान केले.देवळी मतदार संघात एकुण मतदार 2 लाख 74 हजार 608 मतदार असून यामध्ये 1 लाख 38 हजार 538 पुरूष तर 1 लाख 36 हजार 70 महिला आहे. यापैकी 98 हजार 849 पुरुष मतदारांनी (71.35 टक्के), 90 हजार 514 स्त्री मतदारांनी (66.52 टक्के) असे 1 लक्ष 89 हजार 363 (68.96 टक्के) मतदारांनी मतदान केले.
हिंगणघाट मतदार संघात एकुण मतदार 2 लाख 97 हजार 547 मतदार असून यामध्ये 1 लाख 51 हजार 538 पुरूष तर 1 लाख 46 हजार 9 महिला आहे. यापैकी 1 लक्ष 11 हजार 416 पुरुष मतदारांनी (73.52 टक्के), 99 हजार 458 स्त्री मतदारांनी (68.12 टक्के) असे 2 लक्ष 12 हजार 874 (70.87 टक्के) मतदारांनी मतदान केले.वर्धा मतदार संघात एकुण मतदार 2 लाख 94 हजार 751 मतदार असून यामध्ये 1 लाख 47 हजार 411 पुरूष तर 1 लाख 47 हजार 329 महिला असुन 11 इतर मतदार आहे. यापैकी 99 हजार 240 पुरुष मतदारांनी (67.22 टक्के), 94 हजार 337 स्त्री मतदारांनी (64.03 टक्के) तर इतर 8 मतरांनी (72.73 टक्के) असे 1 लक्ष 93 हजार 585 (65.68 टक्के) मतदारांनी मतदान केले. वर्धा जिल्हृयातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले.
मतदार जागृती (स्वीप) अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून मतदारांपर्यंत मतदान करण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आला. रांगोळी, विविध स्पर्धा, बाईक रॅली, मतदार जनजागृती चित्ररथ, विद्यार्थ्यांचे आई वडिलांना पत्र, विविध शिक्के, पथनाट्य, सिने व नाट्य क्षेत्रातील कलावंत यांचे मतदानाचे आवाहन व्हिडीओ, होर्डिंग, स्टँडी, दीपोत्सव आदी माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात आल्याने नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून दिल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.