

Death Threat Kidnapping Nagpur
नागपूर: चार वर्षापासून मुलीसोबत असलेले प्रेम संबंध अधिक पुढे जाऊ नयेत, या दृष्टीने पित्याने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मुलीच्या प्रियकराचे अपहरण आणि जबर मारहाण केल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्यात अंतर्गत उघडकीस आली आहे. आर्यन देवेंद्र खोब्रागडे असे मारहाण झालेल्या प्रियकराचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बबलू व इतर तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वॉटर कॅन सप्लायचा व्यवसाय असलेला आर्यन राजकुमार केवलरामनी शाळा परिसरात दुचाकीने आला असता बबलू व त्याचे तीन साथीदार कारमधून त्या ठिकाणी आले. माझ्या मुलीसोबत का बोलतो, असे म्हणून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तिघांनी बळजबरीने त्याला कारमध्ये टाकले आणि त्याला घेऊन कपिलनगर मध्ये नारी परिसरात गेले व त्याला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. सुगतनगर परिसरात सोडल्यानंतर सर्वजण पसार झाले. आर्यन याने तातडीने मित्राच्या मोबाईलवर त्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर जरीपटका पोलिसांत तक्रार दाखल केली.