

Fine imposed for Banned Plastic Nagpur
नागपूर : दिवाळीत वस्तू खरेदी करताना प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर कमी व्हावा याकरिता दिवाळीच्या दिवसात महानगर पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे. एनबीटीसी ट्रांसपोर्ट कंपनी, सी.ए रोड वर धडक कारवाईत दिल्ली येथून आणलेल्या प्लास्टिक पिशवीचा वापर मेहंदी पॅकिंगसाठी केला जात होता. या कारवाईत 2 टन असे एकूण 50 बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. ज्याची किंमत एकूण 4 लाख 90 हजार रुपये अशी आहे. सदर कारवाई ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
७९ मायक्रोन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणे प्रतिबंधित आहे. मात्र काही व्यावसायीक प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करीत आहेत. घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त राजेश भगत आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.
यासोबतच पथकाने 122 प्रकरणांची नोंद करून ५३ हजार ७०० रुपयाचा दंड वसूल केला.यामध्ये हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 41 प्रकरणांची नोंद करून 16,400 रुपयांची वसुली करण्यात आली.