समलिंगी व्यक्तींसाठी दोन दशके लढा देणारे आनंद चांदराणी यांचे निधन

समलिंगी व्यक्तींसाठी २००५ मध्ये सारथी ट्रस्टची स्थापना
Gay rights activist Anand Chandrani passed away
समलिंगी व्यक्तींसाठी दोन दशके लढा देणारे आनंद चांदराणी यांचे निधनFile Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

समलिंगी व्यक्तींसाठी असलेल्या सारथी ट्रस्टचे संस्थापक्र अध्यक्ष आनंद चांदराणी यांचे आज (शुक्रवार) दि. २७ सप्टेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ५१ वर्षांचे होते. (Anand Chandrani)

समलिंगी व्यक्तींसाठी २००५ मध्ये सारथी ट्रस्ट या संस्थेची स्थापना केलेल्या आनंद चांदराणी यांनी आयुष्यभर समलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी लढा दिला. समलिंगी व्यक्तींच्या आरोग्य, शिक्षण व नागरी हक्कांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, उपक्रम राबविले व जनजागरणाचे कार्य केले.

त्यांच्याच पुढाकाराने विदर्भात समलिंगी व्यक्तींच्या चळवळी उभ्या झाल्या व समलिंगी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्ग खुला होऊ लागला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव, लता मंगेशकर हॉस्पीटल, वानाडोंगरी येथे दान करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news