नागपुरातील ब्राऊनफिल्ड विमानतळाचा मार्ग मोकळा

या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला
Brownfield Airport route in Nagpur cleared
नागपुरातील ब्राऊनफिल्ड विमानतळाचा मार्ग मोकळा File Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपूरच्या जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मार्ग मोकळा झाला याचा मला अतिशय आनंद आहे. हे विमानतळ व्हावे, हे माझे स्वप्न होते आणि त्यासाठी भरपूर परिश्रम मी घेतले. नागपूरच्या मिहान प्रकल्पाचा हा खरा टेकऑफ असेल! या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

यासंदर्भात शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह याचिका खारीज केली. देवेद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना हाती घेतलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यांनीच संपूर्णपणे या प्रकल्पाचे नियोजन केले होते आणि त्यांच्याच काळात जीएमआरला हे काम देण्यात आले हे विशेष. दरम्यान, या विरोधात याचिका दाखल झाली होती. आता या निर्णयामुळे नागपुरात नवे जागतिक दर्जाचे विमानतळ तयार होणार असून यात 2 समांतर धावपट्ट्या असणार आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून, ते म्हणाले की, यामुळे नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. हे विमानतळ व्हावे, हे माझे स्वप्न होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news