

Parrot Rescue in Nagpur
नागपूर: शहरातील मोतीबाग रेल्वे चौक समोरील झोपडपट्टीमधील एका घरातून भारतात विक्रीसाठी आणलेल्या 54 पोपटांची सुटका पीपल्स फॉर ॲनिमलच्या सहकार्याने वनखात्याने केली.
वन्यजीव अधिनियम 1972 च्या अनुसूची 4 मध्ये पोपट हा पक्षी समाविष्ट आहे. शहरात पोपटांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. आरोपी फरार असून शोध वनविभाग घेत आहे. सदर कार्यवाही ही उपवनसंरक्षक भगतसिंग हाडा, विभागीय वन अधिकारी (दक्षता) प्रीतम सिंह कोडपे व मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक-1 नागपूर एस. जी आठवले, आर. एच इरपाची, क्षेत्र सहायक एस. एस. राऊत, वनरक्षक तसेच पीपल फॉर एनिमल्स वर्धाचे कौस्तुभ गावंडे व आशिष कोहोळे यांच्या मार्फत करण्यात आली.
जप्त केलेले पोपट वैद्यकीय तपासणीकरिता नागपूर टीटीसी येथे पाठविण्यात आले आहेत. या पक्ष्यांना लवकरच नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे.