गोंदियामध्ये पावसाचा तांडव; दिड हजार घरांसह ४१७ गोठ्यांची पडझड

चौघांच्या मृत्यूची नोंद; तीन हजार कोंबड्यांसह ४७ जनावरे दगावली
heavy rainfall Gondia
गोंदियामध्ये मुसळधार पाऊस
Published on
Updated on

गोंदिया : आठवडाभरापासून पावसाची उघडझाप सुरु असताना सोमवारी (दि.९) पावसाने रौद्ररूप धारण केले. रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण गोंदिया जिल्हा जलमय झाला. सद्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी (दि.१०) दिवस-रात्र सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील चौघांचा बळी घेतला असून दिड हजार घरांसह ४१७ गोठ्यांची पडझड झाल्याचे वास्तव पुढे आले आहे.

heavy rainfall Gondia
चंद्रपूर : मुसळधार पावसात घराची भिंत अंगावर कोसळून दांपत्याचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात सोमवार (दि. ९) दुपारी ४ वाजताच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. यानंतर रात्रभर मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे जिल्ह्यातील पुजारीटोला, कालीसराड, शिरपूर आदी प्रकल्पाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याने सर्वच धरणाचे वक्रद्वार उघडण्यात आले. परिणामी जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत सर्वत्र पुर परिस्थितीत निर्माण झाली. दुसरीकडे संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पुर आल्याने अनेकांच्या शेतपिकाचे नुकसान झाले. एकंदरीत संपूर्ण जिल्हा ओलाचिंब झाला.

महत्वाचे म्हणजे, मंगळवारी ( दि. १०) गोंदिया शहरातील फुलचुर नाल्याला आलेल्या पूरामुळे नाल्या शेजारील इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर शहरातील सखोल भागात पावसाचे पाणी साचून अनेकांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली. दरम्यान, बुधवारी (दि.११) पावसाने उसंत घेतली असली तरी प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार पावसामुळे जिल्ह्यात भीषण नुकसान झाल्याचे वास्तव पुढे आले आहे.

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजानुसार मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात दोन दिवसात १६ घरे पुर्णतः पडल्याची नोंद झाली असून १ हजार ४८४ घरांची व ४१७ गोठ्यांची अंशतः पडझड झाली आहे. त्यातच चौघांचा बळी या पावसाने घेतला आहे. यात गोंदियात इमारत कोसळून दोन तर आमगाव तालुक्यात एकाचा विद्युत करंट लागून मृत्यू झाला आहे. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणात मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. त्याचबरोबर ४७ छोटी जनावरे दगावली असतानाच ३ हजार कोंबडीचे पिल्लू मृत्यूमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याच बरोबर पुराच्या पाण्यात वाहून २४ शेळ्या ठार झाल्या असताना ६ शेळ्या वाहून गेल्या असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे.

६९ जणांचा रेस्क्यू तर ८८५ जणांना केले स्थलांतर

जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पुर आले, ज्यामध्ये जिल्ह्यातील विविध गावातील पुरात अडकलेल्या ६९ जाणांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर नदी काठावरील गावातील सुमारे ८८५ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यात नुकसान झाल्याचा अंदाज असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
राजन चौबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, गोंदिया
heavy rainfall Gondia
मुसळधार पावसामुळे नदी नाल्‍यांना पूर; शेकडो एकर जमीन पाण्याखाली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news