पर्यटकांसाठी खुशखबर: नवेगाव-नागझिरा अभयारण्य लवकरच होणार खुले

Nawegaon-Nagzira Sanctuary | ऑनलाईन बुकिंग सुरू
Nawegaon-Nagzira sanctuary open soon
नवेगाव-नागझिरा अभयारण्य पर्यटकांसाठी लवकरच खुले करण्यात येणार आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याच्या कालावधीत बंद केलेले नवेगाव-नागझिरा (Nawegaon-Nagzira Sanctuary) अभयारण्य पर्यटकांसाठी लवकरच खुले करण्यात येणार आहे. यासाठी व्याघ्र प्रकल्पातर्फे ऑनलाईन बुकिंग सुरू केले आहे. यानुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील उमरझरी, बकी व पितांबरटोला हे प्रवेशद्वार वगळता इतर सर्व गेटमधून पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

नवेगाव-नागझिरा (Nawegaon-Nagzira Sanctuary) व्याघ्र प्रकल्पाचे सफारी व इतर उपक्रम महाराष्ट्र वन विभागाच्या आरक्षण प्रणालीद्वारे सुरु करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ ते १५ जून २०२५ पर्यंत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे सफारीकरीता महाराष्ट्र वन विभागाच्या http://safaribooking.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रणालीद्वारे सफारीचे आरक्षण (दि. १८) सुरु करण्यात आले आहे. यात उमरझली, बकी व पितांबरटोला हे प्रवेशद्वार सद्या बंद राहणार आहे. पिटेझरी, मंगेझरी, चोरखमारा-१, चोरखमारा-२, चंद्रपूर व खोली प्रवेशद्वारावरुन पुर्णत: ऑनलाईन पध्दतीने पर्यटनासाठी सुरु करण्यात येत असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सफारी बुकिंग करताना फक्त http://safaribooking.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन प्रणालीद्वारे सफारीचे आरक्षण करता येणार आहे. तर व्यतिरिक्त दुसऱ्या संकेतस्थळावरुन आरक्षण केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या पेचप्रसंगास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही.
- जयरामेगौडा आर. उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्प
Nawegaon-Nagzira sanctuary open soon
गोंदिया : आवास योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याची बाजी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news