गडचिरोली : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन महिने कारावासाची शिक्षा

सात वर्षानंतर पीडितेला न्याय
Gadchiroli Crime News
विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन महिन्याचा सक्षम कारावासfile photo
Published on
Updated on

गडचिरोली येथील एटापल्ली नजिक गावाबाहेर प्रातःविधी करण्यास जाणाऱ्या महिलेस आडवून तिचा विनयभंग करण्याची घटना घडली होती. ही घटना 24 ऑक्टोबर 2017 दिवशी घडली होती. या घटनेतील संशयित आरोपीला अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ महिन्यांचा कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जगन्नाथ शिवकुमार बैरागी (वय.३६, रा.पंदेवाही,ता.एटापल्ली) असे आरोपीचे नाव आहे.

Gadchiroli Crime News
विद्यार्थिनींचा विनयभंग : देशिंग व पंचक्रोशीत कडकडीत बंद, निषेध मोर्चा

घटना घडलेल्या दिवशी जगन्नाथ पीडितेच्या मागे जात होता. यानंतर पीडितेला आपला कोणतरी पाठलाग करत असल्याचे समजताच ती मागे फिरली. यानंतर जगन्नाथने तिला रस्त्यावर अडवून तिच्यासोबत अभद्र वर्तवणूक करुन तिचा विनयभंग केला. यानंतर महिलेने संशयिताविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. एटापल्लीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत भोसले यांनी तपास पूर्ण केल्यानंतर अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान पोलिसांनी संशयिताला अटक केली. यानतंर त्याच्यावर गुन्हा नोंद करुन त्याचावर मागील सात वर्ष न्यायालयात घटला सुरु होता.

Gadchiroli Crime News
सांगली : शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

शुक्रवारी (दि.13) या प्रकरणाचा निकाल लागला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.बावणकर यांनी साक्षदारांचा जबाब आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी जगन्नाथ बैरागी यास ३ महिन्यांचा कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news