गडचिरोली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने गडचिरोली जिल्ह्यातील १७ पोलिस अधिकारी आणि शिपायांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक, तर एका अधिकाऱ्यास गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर केले आहे. (Gadchiroli Shouryapadak announced)
शौर्यपदक जाहीर झालेल्यांमध्ये गडचिरोलीचे तत्कालिन अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक दीपक आवटे, धनाजी होनमाने (शहीद), पोलिस नाईक नागेशकुमार मादरबोईना, पोलिस शिपाई शकील शेख, विश्वनाथ पेंदाम, विवेक नरोटे, मोरेश्वर पोटावी, कैलाश कुळमेथे, कोल्ला कोरामी, कोरके वेलादी, महादेव वानखेडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल देव्हाडे, विजय सपकाळ, हवालदार महेश मिच्चा आणि पोलिस नाईक समय्या आसम यांचा समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षक मधुकर नैताम यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे. (Gadchiroli Shouryapadak announced)
२०१७ मध्ये कापेवंचा-कवठाराम, २०१९ मध्ये मोरमेट्टा आणि २०२२ मध्ये कापेवंचा-नैनेर इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकीत पोलिसांनी ४ नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. या चकमकीत दाखविलेल्या शौर्याची दखल घेऊन शासनाने १७ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्यपदक जाहीर केले आहे. (Gadchiroli Shouryapadak announced)
विशेष म्हणजे, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिस दलातील ४१ हवालदार यांना सहायक फौजदारपदी, तर ५५ पोलिस नाईक अंमलदार यांना हवालदारपदी पदोन्नती मिळाली आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शौर्यपदक प्राप्त अधिकारी आणि शिपाई तसेच पदोन्नत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.