गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि.६) गडचिरोली दौऱ्यावर आहेत. पवार हे अहेरी व आलापल्ली येथे विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्यांचे आगमन शुक्रवारी सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने अहेरी येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते नागेपल्ली येथील राजे धर्मराव विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर आलापल्ली येथे आयोजित जनसन्मान यात्रेत ते शेतकरी आणि लाडक्या बहिणींशी संवाद साधतील. या कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम उपस्थित राहणार आहेत.