चंद्रपूर : दोन शिक्षकांनीच केला विद्यार्थीनीचा विनयभंग

रेल्वेद्वारे पळून जाताना दोन्ही शिक्षकांना अटक
School girl molested By teacher
शिक्षकांकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग File Photo
Published on
Updated on

वरोरा शहरातील एका कॉलेज मध्ये स्वत:च्या वाढदिवसादिवशी चॉकलेट भेट दिलेल्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी (दि.30) उघडकीस आली आहे. यानंतर रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे अशी संशयितांची नावे आहेत.

School girl molested By teacher
जळगाव : बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

चंद्रपूरातील कॉलेजमध्ये दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्याथींनीला वाढदिवसाचे निमित्ताने आपले रुम बोलवून तिला चाकलेट देवुन भेट दिली. त्या बदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून जबरीने विद्याथींनीस गळे लागुन बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्याथींनी मुलीने कशीबशी आपली सुटका करुन त्यांच्या तावडीतून सुटून पळ काढला. त्यानंतर पोलीस स्टेशन वरोरा येथे घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदविली. वरोरा पोलीसांनी तात्काळ विनयभंग व पोक्सो अंतर्गत दोन्ही शिक्षकावर गुन्हे दाखल केले.

School girl molested By teacher
चंद्रपूर : नागभीड तालुक्यात आठ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग

घटनेनंतर पसार दोन्ही संशयीत शिक्षक आरोपी पसार झाले होते. सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी फरार आरोपीचा शोध घेणे सुरु केले. पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात शोध पथक तयार केले. त्यांचे समवेत सायबर पथक पाठवुन शोधमोहीम सुरू केली. दोन्ही संशयीत आरोपी शिक्षक रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना वरोरा रेल्वे स्टेशन दोघांनाही अटक केली. आरोपींना वरोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांचे स्वाधीन करण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अजिक्य तांबडे करीत आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा जिल्ह्यात सर्वत्र निषेध करण्यात यत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news